पाठवू नये-ख्रिसमसला शिका विविध प्रकारचे केक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST2020-12-24T04:22:38+5:302020-12-24T04:22:38+5:30
(बातमीत केक वर्कशॉप लोगो वापरणे) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रेड वेल्वेट केक, फाऊंडन्ट केक, डॉल केक, वेडिंग डबल ...

पाठवू नये-ख्रिसमसला शिका विविध प्रकारचे केक
(बातमीत केक वर्कशॉप लोगो वापरणे)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रेड वेल्वेट केक, फाऊंडन्ट केक, डॉल केक, वेडिंग डबल लेअर केक, बास्केट फ्रुट केक.... अहाहा! ही नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं ना...? हे केक विकत आणण्यापेक्षा घरीच बनवता आले तर? आहे की नाही यम्मी कल्पना! यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने महिलांची घरीच केक बनवण्याची हौस पूर्ण होणार आहे; कारण ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने उद्या, शुक्रवारी केक वर्कशाॅपचे आयोजन करण्यात आले आहे.
कुटुंबातील लहान-मोठ्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, एखादे सेलिब्रेशन असले की केक लागतोच; पण तो घरी बनवण्याची रेसिपी माहीत नसल्याने इच्छा असली तरी महिलांना केक बनवायला मिळत नाही. महिला-युवतींची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत सखी मंच’ने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. स्टेशन रोडवरील अविक कॉम्प्लेक्स येथे सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत प्रसिद्ध पाककला तज्ज्ञ उज्ज्वला भोसले हे केकचे प्रकार शिकविणार आहेत. यात रेड वेल्वेट केक, फाऊंडन्ट केक, डॉल केक, वेडिंग डबल लेअर केक, बास्केट फ्रुट केक, जेल केक, टायगर प्रिंट केक, मिरर केक, फोटो प्रिंट केक, रोझ हनी केक असे केकचे दहा प्रकार त्या शिकविणार आहेत. यावेळी उपस्थितांना प्रिंटेड नोट्स, वेलकम ड्रिंक आणि दुपारचे जेवण, तयार केक बॉक्स, प्रमाणपत्र आणि केव्हीज फूडकडून हमखास गिफ्ट मिळणार आहेत.
---
या कार्यशाळेत रेड वेल्वेट आणि फाऊंटन्ड पैठणी साडी केकचे खास आकर्षण आहे. सखी सदस्यांना एक हजार रुपये व अन्य महिलांना १५०० रुपये भरून कार्यशाळेत सहभागी होता येईल. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लोकमत शहर कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे किंवा ९६३७३३०७००, ८३२९५७२६२८ येथे संपर्क साधावा. ज्यांना आधी नोंदणी शक्य नसेल त्या कार्यशाळेला आल्यानंतरही ऑन द स्पॉट नोंदणी करू शकतात.
...
इंदुमती गणेश