(वाचू नये / वापरू नये) ‘राष्ट्रवादी’च्या वतीने पवार याच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याची घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:36 IST2020-12-14T04:36:15+5:302020-12-14T04:36:15+5:30
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान देण्याचा शपथ विधी कार्यक्रम नुकताच ...

(वाचू नये / वापरू नये) ‘राष्ट्रवादी’च्या वतीने पवार याच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याची घेतली शपथ
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान देण्याचा शपथ विधी कार्यक्रम नुकताच येथील सायबर चौकात झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस कोल्हापूर दक्षिणचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात करवीर श्री अंबाबाई चरणी पवार यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमीत्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सायबर चौकामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस कोल्हापूर दक्षिण पार्टीच्यावतीने फलक उभारला. सिंचनापासून फळ लागवडीच्या विस्तारापर्यत आणि कृषी मालाच्या हमीभावापासून ते कर्जमाफीपर्यत शेतकर्यांच्या विकासाचा समग्र विचार पवार यांनी केला. अडचणीच्या काळात पवार यांचे शेती विचार आचरणात आणून शेतकर्यांच्या खांद्याला खांदा लावून बळ देऊया, स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ३३ टक्के जागा राखीव ठेवत स्त्रियांच्या राजकिय कर्तुत्वाला अवकाश दिला. पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून त्यांनी स्त्रीस मानतेचा विचार रुजवला. कला, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा आदी विवीध क्षेत्रातील मान्यवरांशी ऋणानुबंध जोडत त्या संस्थांना प्रतिष्ठा मिळवून दिली. आदी त्यांच्या कर्तृत्वाची आठवण करत त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याची शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमात अध्यक्ष नितीन पाटील, पीटर चौधरी, निरंजन कदम, सुरेंद्र माने, विनायक जगनाडे, अंकूश रांजगणे, सुनिता कांबळे, शुभांगिणी चिनाटे, संपदा काळे, गब्बर मुल्ला, राजेंद्र मोरे, दिपक कश्यप, कल्पना रांजगणेकर, राजू मुल्ला, बापू पोवार, संग्राम जाधव, रिजाय जैनापूरे, मुमताज बंदुवाले, अमर जगताप, संदीप आमते, ओंकार भगवान आदींचा मोठा सहभाग होता.
फोटो नं. १३१२२०२०-कोल-एमसीपी०१
ओळ : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कोल्हापूर दक्षीण पाटींच्यावतीने सायचर चौकात शुभेच्छा फलक उभा करुन पक्षाच्यावतीने पवार यांच्या सप्नातील महाराष्ट्र घडविणार असल्याची सर्वांनी शपथ उपस्थितांनी घेतली.