CoronaVirus Lockdown : खूळ जाईना ! ताजी भाजीखरेदीसाठी झुंबड: धान्य, मिरची खरेदीने लक्ष्मीपुरी जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:45 IST2020-04-11T19:42:44+5:302020-04-11T19:45:05+5:30
लॉकडाऊनला १८ दिवस झाले, पुढे आणखी १५ दिवस वाढले तरी लोकांचे बाहेर फिरण्याचे खूळ काही कमी व्हायला तयार नाही. भाजी ही रोजच्या रोज, ताजीच खरेदी करायची असते, हे खूळ ही कोल्हापूरकरांच्या डोक्यातून जायला तयार नाही.

CoronaVirus Lockdown : खूळ जाईना ! ताजी भाजीखरेदीसाठी झुंबड: धान्य, मिरची खरेदीने लक्ष्मीपुरी जाम
ठळक मुद्देखूळ जाईना ! ताजी भाजीखरेदीसाठी झुंबडधान्य, मिरची खरेदीने लक्ष्मीपुरी जाम
कोल्हापूर : लॉकडाऊनला १८ दिवस झाले, पुढे आणखी १५ दिवस वाढले तरी लोकांचे बाहेर फिरण्याचे खूळ काही कमी व्हायला तयार नाही. भाजी ही रोजच्या रोज, ताजीच खरेदी करायची असते, हे खूळ ही कोल्हापूरकरांच्या डोक्यातून जायला तयार नाही.
प्रशासनाने कितीही ओरड केली, कारवाईचा हिसका दाखविला तरी भाजीपाल्यासह धान्य आणि मिरची खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे लक्ष्मीपुरीतील रस्ते गर्दीने ओसंडून वाहत आहेत. मालवाहतूक घेऊन येणारे ट्रक आणि त्यात नागरिकांची वाहनासह गर्दी यांमुळे लक्ष्मीपुरी जाम होत आहे.