शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

वातावरण बघून शिंदे गटात आलेल्यांना पदे देऊ नका, क्षीरसागर गटाची भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 11:44 IST

माजी आमदार चंद्रदीप नरके यांना पडद्याआडून विरोध

कोल्हापूर : वातावरण बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांना शासकीय समित्या, महामंडळावर घेऊ नये, अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी घेतली आहे. जिल्हाप्रमुख चव्हाण हे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे समर्थक मानले जातात. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे क्षीरसागर गटाने त्यांच्या नावाला अप्रत्यक्षरित्या विरोध केल्याचेच मानले जात आहे.जिल्हाप्रमुख चव्हाण यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होऊन वर्षाचा कालावधी उलटला आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्यात विविध सरकारी समित्या व महामंडळांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उठावानंतर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिकांचीच शासकीय समित्या आणि महामंडळांवर नियुक्ती करण्यात यावी, असा निर्णय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उठावानंतर त्यांच्या पाठीशी ठाम राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांचीच नियुक्ती व्हावी. सध्याच्या घडीला काहीजण वातावरण बघून प्रवेश करत आहेत. शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या शिवसैनिकाला न्याय द्यावा, अशी मागणी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नरके यांची आता जवळीक...माजी आमदार नरके यांनी गेल्यावर्षी झालेल्या सत्तांतरामध्ये सुरुवातीला उघड भूमिका घेतली नव्हती. वेळ आल्यावर योग्य भूमिका घेऊ, असे ते सांगत आले. ‘शासन आपल्या दारी’च्या निमित्ताने त्यांनी उघडपणे मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेतृत्व स्वीकारले. नरके यांचे व्याही हे मुख्यमंत्र्यांचे उजवे हात मानले जातात. त्यातून त्यांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्याकडे सध्या कोणतेच पद नसल्याने देवस्थान समितीसाठी त्यांचे नाव पुढे आल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरShiv Senaशिवसेना