शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीत नियमात ‘डॉल्बी’

By admin | Updated: September 9, 2016 01:12 IST

व्यावसायिकांची धरणे : नियमाचे बंधन मान्य; पूर्णपणे बंदीला विरोध

कोल्हापूर : गणेशोत्सवात नियमात राहून डॉल्बी वाजविण्याला परवानगी द्यावी, या मागणीसाठी गुरुवारी कोल्हापूर जिल्हा साउंड असोसिएशनने पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गणेशोत्सवात दि. ९, १०, १५ सप्टेंबर या तीन दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत, तर इतर दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत दोन बेस आणि दोन टॉप, ६० डेसिबल आवाज मर्यादेपर्यंत नियमात राहून डॉल्बी वाजविण्यास परवानगी देण्यात आली.यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात उच्च न्यायालयाने ‘डॉल्बी’ वाजविण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांनी ‘डॉल्बी’ला पूर्णत: बंदी घातली. यावर जिल्हा साउंड असोसिएशनने आक्षेप घेत गुरुवारी जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयासमोर दुपारनंतर धरणे आंदोलन केले. शहर पोलिस उपअधीक्षक भारत राणे यांनी त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; पण उच्च न्यायालयाच्या नियमात राहून ‘डॉल्बी’ला परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशनने केली. सायंकाळी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी नियमात राहून डॉल्बी लावण्यास परवानगी दिली. मात्र, आवाजाचे व वेळेचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश दिले. शिवाय याबाबतचा आदेश सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेस यंत्रणेवरून कळविण्यात आला. या शिष्टमंडळात जिल्हा साउंड असोसिएशनचे अध्यक्ष मुनीर मुल्ला, विजय वरुटे, शब्बीर पटेल, सरदार पाटील, संजय नलवडे, सागर गवळी, प्रदीप गायकवाड, आदी साउंड व्यावसायिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)दि. ९, १० आणि १५ सप्टेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत, तर इतर दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत परवानगीदोन टॉप, दोन बेस लावण्यास परवानगी६० डेसिबलपर्यंत साउंड मर्यादानियम तोडणाऱ्यांवर तातडीने कारवाई