शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय महाडिकांची फसवणूक कदमांना दिसत नाही का?, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 11:43 IST

राजकीय आकसापोटी सतत आरोप करण्याचे काम करणाऱ्या सुनील कदम यांनी महापौरपदाच्या कालावधीत शहरातील सर्वाधिक आरक्षण उठविण्याचा विक्रम केला. त्यामुळे कदमांची कोल्हेकुई म्हणजे चाेराच्या उलट्या बोबा आहेत.

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील व त्यांच्या कुटुंबीयांच्या घरफाळ्याचे कोणतेही प्रकरण थकीत नाही. त्यांनी रीतसर घरफाळा भरलेला आहे. तरीही निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या कदम बंधूंना माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मिळकतींच्या बाबत महापालिका प्रशासनाची केलेली फसवणूक दिसत नाही का, असा सवाल सोमवारी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी पत्रकारांशी बाेलताना केला.पालकमंत्री पाटील व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित सयाजी हॉटेलसह अन्य मिळकतींचे पुन्हा एकदा फेरसर्वेक्षण करावे आणि आवश्यकता भासल्यास नियमानुसार घरफाळा आकारणी करावी, तसेच कदम बंधूंचे नातेवाईक असलेल्या माजी खासदार महाडिक यांच्या संबंधित आम्ही देत असलेल्या मिळकतींचेही सर्वेक्षण करून नियमाप्रमाणे घरफाळा आकारणी करावी, अशा दोन्ही मागण्या सोमवारी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या. त्यानंतर पत्रकारांना माहिती दिली.प्रशासक बलकवडे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, निलोफर आजरेकर, संजय मोहिते, अर्जुन माने, संदीप नेजदार, मोहन सालपे, सागर यवलुजे, दुर्वास कदम, अश्पाक आजरेकर, विजय सूर्यवंशी यांचा समावेश होता.

राजकीय आकसापोटी सतत आरोप करण्याचे काम करणाऱ्या सुनील कदम यांनी महापौरपदाच्या कालावधीत शहरातील सर्वाधिक आरक्षण उठविण्याचा विक्रम केला. त्यामुळे कदमांची कोल्हेकुई म्हणजे चाेराच्या उलट्या बोबा आहेत. माजी खासदारांनी शहरात बांधलेल्या मालमत्तेच्या घरफाळ्यात कितीतरी अनियमितता आहे. त्याच्या माध्यमातून होणारे नुकसान कदमांना का दिसत नाही, असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.

लक्ष्मीपुरीतील भीमा वस्त्रम, स्टेशन रोडवरील कैलास टॉवर, ताराबाई पार्कमधील कृष्णा सेलिब्रिटी, शिवाजी पार्क येथील किंग्ज काेर्ट या इमारतींच्या बाबतीत महापालिकेचे नुकसान झाले आहे. गोदामे बांधल्याचे दाखवून जागेचा व्यावसायिक कारणासाठी उपयोग होत आहे. किंग्ज कोर्ट इमारत तर रस्त्यावर बांधून विकण्यात आली. त्या शेजारी असणारी पालिकेची खुली जागा जाण्या-येण्यासाठी वापरली जात आहे, याकडेही निवेदनात लक्ष वेधले आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकcongressकाँग्रेसBJPभाजपा