शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याने सांगून डॉक्टर पिता, पुत्रास ४३ लाखांचा गंडा, कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 12:14 IST

तोतया पोलिस निरीक्षकाचे कृत्य, न्यायालयाच्या बनावट पत्राचा वापर

कोल्हापूर : तुमचा अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याने तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे अरेस्ट वॉरंट काढलेले आहे, असे सांगून राजारामपुरीतील डॉ. महेश्वर दत्तात्रय शितोळे (वय ३५) आणि त्यांचे वडील डॉ. दत्तात्रय शितोळे यांना ४२ लाख ९१ हजार रुपयांस तोतया पोलिस निरीक्षकाने गंडा घातला. डिजिटल अटकेची भीती दाखवून कुलाबा येथून बोलणाऱ्या तोतया पोलिस निरीक्षकाने ही फसवणूक केली. ९ ते २८ ऑगस्टदरम्यान ही घटना घडली.डॉ. दत्तात्रय शितोळे यांचे राजारामपुरी पहिल्या गल्लीत शितोळे हॉस्पिटल आहे. त्यांचा मुलगा डॉ. महेश्वर हे वडिलांना हॉस्पिटलमध्ये मदत करतात. डॉ. महेश्वरच्या पत्नी अक्षरा याही डॉक्टर आहेत. आईही डॉक्टर असून इस्लामपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. डॉ. महेश्वर हे वारणानगर येथे दमयंती हॉस्पिटल चालवतात. ९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वारणानगर येथील हॉस्पिटलमध्ये असताना डॉ. महेश्वर यांच्या मोबाईलवर फोन आला. मी मुंबई कुलाबा येथून बोलत असून तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून एका भामट्याने मुंबईत तुमच्या नावाने आधार कार्ड, बॅँक पासबुक काढले आहे.अतिरेकी संघटनांना पैसे पाठविण्यासाठी त्याचा वापर झाला आहे. भविष्यात तुम्हाला अडचणी येणार आहेत. मी तुम्हाला या प्रकरणात मदत करतो, असे सांगितले. यानंतर डॉ. दत्तात्रय शितोळे यांना कॉल करून तुमच्या मुलास अटक होईल, अशी भीती दाखवून वेळोवेळी ४२ लाख ९१ हजार रुपये स्वीकारले. आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टर पिता-पुत्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात ४२ लाख ९१ हजार रुपयांची फसवणुकीची फिर्याद दिली.

नॅशनल सिक्युरिटी प्रोटोकॉलची भीतीतोतया पोलिस निरीक्षक रॉय याने डॉ. शितोळे पित्रा, पुत्रास नॅशनल सिक्युरिटी प्रोटोकॉलची भीती घालून घरच्यांनाही माहिती देऊ नका, असे सांगितले होते. अंगावरील खाकी वर्दी, पोलिस ठाण्याची इमारत, सर्वोच्च न्यायालयाची अटकेची नोटीस दाखवत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. चौकशी संपल्यानंतर पैसे तुमच्या खात्यावर वर्ग केले जातील, असे सांगून फसवणूक केली.