शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने डॉक्टराचा मृत्यू, कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 14:12 IST

नेहमीप्रमाणे घरीच पहिल्या मजल्यावर व्यायाम करीत असताना घडली दुर्घटना

गडहिंग्लज : ट्रेडमिलवर व्यायाम करून वजन उचलताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. प्रमोद दुंडाप्पा तथा पी. डी. कल्याणशेट्टी (वय ६५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (२०) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. आज, बुधवारी (२१) सकाळी १० वाजता येथील बेलबागनजीकच्या लिंगायत दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील सरस्वतीनगरात राहणाऱ्या डॉ. कल्याणशेट्टी यांचा दवाखाना शहरातील चर्च रोडनजीक आहे. डॉ. कल्याणशेट्टी हे शल्यविशारद तर त्यांच्या पत्नी रूपा या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. मंगळवारी (२०) सकाळी डॉ. कल्याणशेट्टी हे नेहमीप्रमाणे बंगल्यातील पहिल्या मजल्यावर व्यायाम करीत होते. काहीवेळ ट्रेडमिलवर व्यायाम केल्यानंतर वजन उचलताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने ते खाली कोसळले.आवाजामुळे डॉ. रूपा या धावून गेल्या. त्यांनी तत्काळ उपचारासाठी त्यांना देसाई हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. गडहिंग्लज मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.सीमाभागात हळहळ..!डॉ. कल्याणशेट्टी हे मूळचे गोकाकचे. वडिलांच्या नोकरीमुळे ते बेळगावला स्थायिक झाले होते. त्यानंतर चार दशकापूर्वी ते गडहिंग्लजला आले. काही काळ त्यांनी येथील मिशन हॉस्पिटलमध्ये सेवा केली. त्यानंतर त्यांनी लाटकर गल्लीत भाडोत्री इमारतीत दवाखाना सुरू केला. कालांतराने चर्चरोडवर स्व:मालकीच्या इमारतीत दवाखाना सुरू केला. प्रेमळ व मनमिळावू स्वभाव आणि कन्नड भाषिक असल्यामुळे गडहिंग्लजच्या पूर्वभागासह सीमाभागातील अनेक रुग्ण त्यांच्याकडे आवर्जून उपचारासाठी येत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टरHeart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यू