शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शासकीय योजनेतील मोफत शस्त्रक्रियेसाठी ८ हजाराची लाच घेणाऱ्या डॉक्टराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:19 IST

गडहिंग्लज येथे लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई

गडहिंग्लज : महात्मा जोतिराव जनआरोग्य योजनेतून मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी ८ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या डॉक्टरासह रूग्णालयाच्या प्रशासकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी डॉ. अजित वसंतराव पाटोळे (वय ४९, रा. साधना हायस्कूलजवळ, संभाजीनगर, गडहिंग्लज) व रूग्णालयाचे प्रशासक इंद्रजीत शिवाजीराव पाटोळे (वय ४८, रा. मिसाळ चाळ, आझाद रोड, गडहिंग्लज) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे गडहिंग्लजसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.तक्रारदाराचा मित्र १० जानेवारीला सायंकाळी चक्कर येवून पडला. त्याच्या डाव्या खुब्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी डॉ. पाटोळे यांच्या स्वराज्य मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात दाखल करण्यात आले.डॉ. पाटोळे यांनी रूग्णाची तपासणी केल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. महात्मा फुले योजनेतून ही शस्त्रक्रिया होवू शकते. मात्र, त्यासाठी २० हजार रूपये भरावे लागतील असे त्यांनी सांगितले. तडजोडीअंती १८ हजार रूपये भरण्याचे ठरले. त्यानुसार १५ जानेवारीला १० हजार रूपये दिल्यानंतर गुरूवारी (१६) रूग्णावर त्यांनी शस्त्रक्रिया केली.उर्वरित ८ हजार रूपये रूग्णालयाचे प्रशासक इंद्रजीत पाटोळे यांच्याकडे देण्यात सांगितले. दरम्यान, रूग्णाच्या मित्राने लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली.  त्यानुसार सापळा लावून ८ हजार रूपये स्विकारताना प्रशासक पाटोळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनिल मोरे, पोलिस हवालदार सुनिल घोसाळकर, संदीप काशीद, पोलिस नाईक सचिन पाटील, कॉन्स्टेबल संदीप पवार, सहायक फौजदार गजानन कुराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आधी संमती..नंतर तक्रार..!स्वराज्य हॉस्पिटलमध्ये रूग्णाला दाखल केल्यानंतर त्याच्या डाव्या पायाच्या खुब्याला दुखापत झाली असून त्याची शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेतून मोफत होईल. परंतु, अन्य आजाराच्या औषधोपचाराचा खर्च द्यावा लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यास रूग्णाच्या बहिणीने लेखी संमती दिली. त्यानंतर लाचलुचपतकडे झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.अशाप्रकारची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागdoctorडॉक्टर