शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हुंडा देणार नाही, घेणारही नाही, लमाण समाजाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 2:40 PM

कोल्हापूर : सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेऊन पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात लमाण समाजाने शुक्रवारी समाजातील बेगड्या प्रथा, परंपरांना ...

ठळक मुद्देहुंडा देणार नाही, घेणारही नाही, लमाण समाजाचा निर्णयकोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा, सेवालाल महाराजांची शपथ 

कोल्हापूर : सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेऊन पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात लमाण समाजाने शुक्रवारी समाजातील बेगड्या प्रथा, परंपरांना मूठमाती देण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. हुंडा देण्याघेण्यावर निर्बंध घालतानाच अंत्यविधीवेळी होणाऱ्या अनावश्यक खर्चाच्या बाबतीतही नवा विचार स्वीकारण्याची समाजाने सामूहिक शपथ घेतली.लमाण समाज विकास संघाच्या नेतृत्वाखाली शाहू स्मारक भवनमध्ये लमाण समाजाचा मेळावा झाला. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील समाजबांधव मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र पवार यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच भरविण्यात आलेल्या या मेळाव्यात सुरेश पवार, वसंतराव मुळीक, अशोक लाखे, विमल राठोड, संजू राठोड, राजू चव्हाण, अविनाश सरनाईक, पुंडलिक चव्हाण, संतोष राठोड, अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती.लमाण समाज भटक्या विमुक्तात मोडतो. या समाजात पारंपरिक प्रथा मोठ्या प्रमाणावर आहेत. या समाजाचे संत असलेले सेवालाल हे पुरोगामी विचारांचे होते. समाजाला अडचणीत घालणाºया प्रथा, परंपरांना त्यांचा विरोध होता. ते स्वत: शाकाहारी होते; पण समाज एकसंघ राहावा म्हणून परंपरांना टोकाचा विरोध केला नाही. परिणामी याचा वेगळा अर्थ काढून समाजात हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथेने पाय घट्ट केले.

साखरपुड्याला ताटात पाच लाख रुपये, त्यानंतर गाडी व उर्वरित १५ लाखांपर्यंतचा हुंडा वधुपित्याकडून घेतल्याशिवाय वर बोहल्यावर चढत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हुंडा देणे समाजातील सर्वसामान्यांना परवडत नाही. तरीही समाजाच्या विरोधात जायचे नाही म्हणून हुंडा देणे-घेणे सुरूच आहे. शिवाय मयताच्या वेळी लाख दीडलाख रुपये सहज खर्च होतात. मांसाहारी पंगती उठतात. यातून समाजातील गोरगरिबांना न झेपणारा खर्च करावा लागतो. प्रसंगी कर्ज काढावे लागते.या प्रथांच्या विरोधात समाजातच आता आवाज उठू लागला आहे. मेळाव्यात सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेत, या प्रथा पाळणार नसल्याचे समाजाने हात उंचावून जाहीर केले. याचे पालन न करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यासह महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचाही निर्णय झाला.

२५ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणभटक्या विमुक्त जाती जमातीला झोपडपट्टी योजना लागू करणे. आदिवासींप्रमाणे लमाण समाजाला हक्काने जमीन मिळणे, विधवांना संजय गांधी निराधार पेन्शन चालू करणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मिळणे, वसंतराव नाईक तांडा वस्तीसाठी ७0 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडविणे, आदी मागण्यांसाठी समाजाने लढ्याची घोषणा केली. २४ पर्यंत निर्णय न झाल्यास २५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूकरण्याचा निर्णय मेळाव्यात झाला.

 

 

टॅग्स :Socialसामाजिकkolhapurकोल्हापूर