शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

Kolhapur: तकलादू विकासकामे करू नका, अजित पवार यांनी बजावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:32 IST

हद्दवाढीवर लवकरच सकारात्मक निर्णय

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जा व गुणवत्तेबाबत तडजोड, तकलादू कामे करू नका. अनुभवी कॉन्ट्रॅक्टर नेमा, पन्हाळ्याचे सुशोभीकरणात स्थानिकांना विश्वासात घ्या, भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून सोयीसुविधा द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातील पर्यटनवाढीच्या कामांसाठी शासनाकडून तत्काळ निधी दिला जाईल. गरजेच्या विकासकामांबाबत केंद्र सरकारशी चर्चा करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, बाबासाहेब आसुर्लेकर उपस्थित होते.कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी मनपाच्या नवीन इमारतीसाठी शेंडा पार्क येथील दोन एकर जागा मिळावी, अशी मागणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता चांगला आहे. येथील १ हजार ९५८ शाळांचा 'समृद्ध शाळा' अभियानाच्या यशस्वितेसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले.यावेळी अंबाबाई व जोतिबा मंदिर विकास आराखडा, क्रिकेट स्टेडियम, कोल्हापूर विमानतळ, पंचगंगा प्रदूषण, शाहू स्मारक भवन, शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम, आयटी हब, शेंडा पार्क येथील रुग्णालय, सारथी संस्था, पंचगंगा प्रदूषण नियंत्रण तसेच कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

७० कोटींचा निधी मिळावा : जिल्हाधिकारी येडगेजिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांसाठी शासनाकडून ७० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी केली. शेंडा पार्कातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तीस विभागांना जागा दिली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय कन्व्हेंक्शन सेंटरचे भूमिपूजन केले जाईल असे सांगितले.

हद्दवाढीवर लवकरच सकारात्मक निर्णयकोल्हापूरच्या हद्दवाढीसंदर्भात नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आहे. याबाबत लवकरच सकारात्मक मार्ग निघून निर्णय होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारcollectorजिल्हाधिकारी