आसगावकर यांच्या विजयानेे सांगरूळमध्ये दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:02+5:302020-12-05T04:58:02+5:30
सांगरूळ : शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर यांच्या विजयाने सांगरूळमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. गुरुवारी रात्री बारापासून शुक्रवारी अधिकृत ...

आसगावकर यांच्या विजयानेे सांगरूळमध्ये दिवाळी
सांगरूळ : शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर यांच्या विजयाने सांगरूळमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. गुरुवारी रात्री बारापासून शुक्रवारी अधिकृत निकाल जाहीर होईपर्यंत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाच्या उधळणीत सारे गाव न्हाऊन गेले होते. प्रा. आसगावकर यांच्या मतमोजणीकडे साऱ्या परिसराचे लक्ष लागले होते. गुरुवारी सकाळपासूनच गावकऱ्यांची घालमेल सुरू होती. गुरुवारी दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होत्या, त्यामुळे अस्वस्थता वाढत होती. सायंकाळी आठनंतर अधिकृत मताधिक्य समजल्यानंतर जल्लोषाची तयारी सुरू झाली. रात्री बारा वाजता आसगावकर यांना भक्कम आघाडी मिळाल्यानंतर जल्लोष सुरू झाला. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या चौकासह गल्लोगल्ली आनंदोत्सव सुरू होता. दुचाकीची रॅली काढून तरुणांनी आनंदोत्सव साजरा केला, तर चौकात दूध व पेढे वाटप करण्यात आले.