शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Kolhapur: गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट, फरकापोटी १०१ कोटी जमा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 14:29 IST

जिल्ह्यासह सीमाभागातील गोकुळच्या ५ हजार २०० दूध संस्थांच्या ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना दर फरकाचा लाभ होणार

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) दूध उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख रुपये प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर २३ ऑक्टोबरला जमा होणार आहेत. संघाकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट मिळेल, अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गुरुवारी दिली.ते म्हणाले, संघाने म्हैस दुधासाठी ५६ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये तर गाय दुधासाठी २७ कोटी ९९ लाख ८२ हजार रुपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ३१ लाख ४६ हजार व डिंबेचर व्याज ७ टक्के प्रमाणे ७ कोटी १२ लाख ९५ हजार रुपये व शेअर्स भांडवलावर ११ टक्के प्रमाणे लाभांश ६ कोटी ५० लाख ९२ हजार रूपये असे एकूण १०१ कोटी ३४ लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे. दर फरकाचा लाभ जिल्ह्यासह सीमाभागातील गोकुळच्या ५ हजार २०० दूध संस्थांच्या ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या एकूण १०१ कोटी ३४ लाख रुपये अंतिम दूध दर फरका व्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षात जवळजवळ ३८ कोटी रुपये सेवा, सुविधांवर खर्च केले आहेत. दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात रमजान ईद सणानिमित्त २ मे २०२३ रोजी २० लाख लीटरची दूध विक्री केली आहे. पालकमंत्री व गोकुळचे नेते हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील व आघाडीचे सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सभासद दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

म्हैस दुधास दोन रुपये २५ पैसेडोंगळे म्हणाले, आर्थिक वर्षाच्या १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दुधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ८० पैसे व गाय दुधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ८० पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक मिळणार आहे. यापैकी प्रतिलिटर ०. ५५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास २ रुपये २५ पैसे व गाय दुधास प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे अंतिम दूध दर फरक देण्यात येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळDiwaliदिवाळी 2022