कसबा वाळवे : शेतजमिनीच्या सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी लाच स्वीकारताना कसबा वाळवे येथे मंडल अधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे (वय ४७) (रा. क्रांतिसिंह नाना पाटील चौक, रिंग रोड कोल्हापूर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी (दि. २३) रंगेहात अटक केली. या कारवाईत २७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडले.याबाबत अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील तक्रारदार यांनी १९ डिसेंबरला एसीबी, कोल्हापूर कार्यालयाकडे लेखी तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या अर्जुनवाडा येथील शेतजमीन गट क्रमांक ४७९ मध्ये सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी जनवाडे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत केला होता.तक्रारीच्या अनुषंगाने १९ व २० डिसेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत आरोपी मंडलाधिकाऱ्याने तक्रारदाराच्या एका प्रकरणासाठी ७ हजार रुपये तसेच तक्रारदाराच्या गावातील इतर चार प्रकरणांसाठी २० हजार रुपये, अशी एकूण २७ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज मंगळवारी (दि. २३) कसबा वाळवे येथे सापळा रचण्यात आला. पडताळणीत ठरल्याप्रमाणे लाच रक्कम स्वीकारताच एसीबी पथकाने मंडलाधिकारी जनवाडे यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल विकास माने, पोलिस नाईक सचिन पाटील व पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील यांनी कारवाई केली.
Web Summary : A Kolhapur district official was arrested in Kasba Walwe for accepting a ₹27,000 bribe to register land records. Anti-Corruption Bureau officers caught Kuldeep Janwade, 47, red-handed after a complaint. He allegedly demanded money for multiple land registration cases in Arjunwada.
Web Summary : कोल्हापुर के कसबा वालवे में एक मंडलाधिकारी को जमीन रिकॉर्ड दर्ज करने के लिए ₹27,000 की रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया गया। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो के अधिकारियों ने शिकायत के बाद कुलदीप जनवाडे (47) को रंगे हाथों पकड़ा। आरोप है कि उन्होंने अर्जुनवाडा में कई भूमि पंजीकरण मामलों के लिए पैसे की मांग की थी।