राज्य क्राॅसकंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:21+5:302021-02-05T07:13:21+5:30
कोल्हापूर : फुलगाव (ता. हवेली, पुणे) येथे रविवारी (दि. ३१) होणाऱ्या राज्यस्तरीय क्राॅसकंट्री स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत प्रथम ...

राज्य क्राॅसकंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर
कोल्हापूर : फुलगाव (ता. हवेली, पुणे) येथे रविवारी (दि. ३१) होणाऱ्या राज्यस्तरीय क्राॅसकंट्री स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत प्रथम पाटील, ओंकार पन्हाळकर, प्राजक्ता शिंदे, उत्तम पाटील, आदींचा समावेश आहे.
बीपीएड् काॅलेज, वाडीपीर येथे कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत १६ वर्षांखालील गटात प्रथम पाटील, आदित्य पाटील, आदिती खोत, अंजली वायसे, तर १८ वर्षांखालील गटात ओंकार पन्हाळकर, केशव माने, सृष्टी रेजेकर, पूर्वा शेवाळे, वीस वर्षांखालील मुलांमध्ये इंद्रजित फराकटे, सिद्धांत पुजारी, ऋषिकेश किरुळकर, अभिषेक देवकाते, अंकुश पाटील, ऋषिकेश महालकर. मुलींमध्ये प्राजक्ता शिंदे, रोहिणी पाटील, शहाजादबी किल्लेदार, केसर दड्डे, काजल दड्डे, मानसी मोरे यांचा समावेश आहे. खुल्या गटात उत्तम पाटील, विश्वजित लव्हटे, अक्षय मोरे, अक्षय आळंदे, सहर्ष चौगुले, शहाजी किरुळकर यांचा समावेश आहे. या निवडी प्रा. प्रकुल पाटील-मांगोरे, अमोल आळवेकर, नवनाथ पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. पंच म्हणून चिन्मय जोशी, वर्षा पाटील, निखिल भारती, सूरज मगदूम, निशांत पाटील, लखन चौगुले, शरद चव्हाण यांनी काम पाहिले.
या खेळाडूंना असोसिएशनचे अध्यक्ष आर. बी. पाटील, सचिव डाॅ. सुरेश फराकटे यांचे मार्गदर्शन लाभले.