शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

Maharashtra Vidhan Sabha 2019 : जिल्ह्यात झाले १०४९ टपाली मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 3:21 PM

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दुसरे प्रशिक्षण जिल्ह्यातील १० मतदारसंघांत सुरू आहे. पहिल्या दिवशी ५२ सुविधा केंद्रांत १०४९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही मतदानाचा हक्क बजावण्यात आला.

ठळक मुद्दे निवडणूक कर्मचाऱ्यांनी ५२ सुविधा केंद्रात बजावला हक्क प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशीचे चित्र

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दुसरे प्रशिक्षण जिल्ह्यातील १० मतदारसंघांत सुरू आहे. पहिल्या दिवशी ५२ सुविधा केंद्रांत १०४९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही मतदानाचा हक्क बजावण्यात आला. मतदानाची प्रक्रिया बुधवारी (दि. १६), गुरुवारी (दि. १७), २० व २१आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ वाजता मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १, २ व ३ यांच्या पथकांसाठी शुक्रवारीही प्रशिक्षण घेण्यात आले.

यामध्ये व्ही. टी. पाटील सभागृह, राजारामपुरी येथे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी, विवेकानंद कॉलेजमधील बापूजी साळुंखे स्मृतिभवन हॉल येथे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी, यशवंतराव चव्हाण सभागृह, राजाराम कॉलेज येथे करवीर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांतील प्रशिक्षणाच्या ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाकरिता ५२ मतदान केंद्रांची सुविधा करण्यात आली आहे.यामध्ये गुरुवारी (दि. १०) १०४९ मतदान कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले. शुक्रवारीही प्रशिक्षणादरम्यान मतदान सुरू राहिले. अद्याप दोन प्रशिक्षण सत्रे होणार आहेत. ती बुधवारी (दि. १६), गुरुवारी (दि. १७), २० व २१आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, या दिवशीही टपाली मतदान सुरू राहणार आहे.दरम्यान, निवडणूक विभागाकडून सीमेवरील सैनिकांसाठीही मतदानासाठी ८७५३ आॅनलाईन मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्यावर मतदान होऊन त्या चार -पाच दिवसांत निवडणूक विभागाकडे यायला सुरुवात होईल, असे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.झालेले टपाली मतदान असेविधानसभा मतदारसंघ      टपाली मतदान

  • चंदगड                                  १३२
  • राधानगरी                            ११४
  • कागल                                 २३१
  • कोल्हापूर दक्षिण                   ६३
  • करवीर                                १६१
  • कोल्हापूर उत्तर                    १३
  • शाहूवाडी                               ५७
  • हातकणंगले                       १३७
  • इचलकरंजी                          ५७
  • शिरोळ                                 ८४

सैनिकांसाठी पाठविलेल्या टपाली मतपत्रिकाविधानसभा मतदारसंघ              टपाली मतपत्रिका

  • चंदगड                                      २२५०
  • राधानगरी                                १०८५
  • कागल                                     १८०७
  • कोल्हापूर दक्षिण                        ४९१
  • करवीर                                      ६४८
  • कोल्हापूर उत्तर                          ९६
  • शाहूवाडी                                 १२२३
  • हातकणंगले                              ४०७
  • इचलकरंजी                              १४८
  • शिरोळ                                     ५९८

 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर