Maharashtra Vidhan Sabha 2019 : जिल्ह्यात झाले १०४९ टपाली मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 03:21 PM2019-10-12T15:21:38+5:302019-10-12T15:27:00+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दुसरे प्रशिक्षण जिल्ह्यातील १० मतदारसंघांत सुरू आहे. पहिल्या दिवशी ५२ सुविधा केंद्रांत १०४९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही मतदानाचा हक्क बजावण्यात आला.

District polls were held in 19 districts | Maharashtra Vidhan Sabha 2019 : जिल्ह्यात झाले १०४९ टपाली मतदान

Maharashtra Vidhan Sabha 2019 : जिल्ह्यात झाले १०४९ टपाली मतदान

googlenewsNext
ठळक मुद्दे निवडणूक कर्मचाऱ्यांनी ५२ सुविधा केंद्रात बजावला हक्क प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशीचे चित्र

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दुसरे प्रशिक्षण जिल्ह्यातील १० मतदारसंघांत सुरू आहे. पहिल्या दिवशी ५२ सुविधा केंद्रांत १०४९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही मतदानाचा हक्क बजावण्यात आला. मतदानाची प्रक्रिया बुधवारी (दि. १६), गुरुवारी (दि. १७), २० व २१आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ वाजता मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १, २ व ३ यांच्या पथकांसाठी शुक्रवारीही प्रशिक्षण घेण्यात आले.

यामध्ये व्ही. टी. पाटील सभागृह, राजारामपुरी येथे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी, विवेकानंद कॉलेजमधील बापूजी साळुंखे स्मृतिभवन हॉल येथे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी, यशवंतराव चव्हाण सभागृह, राजाराम कॉलेज येथे करवीर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांतील प्रशिक्षणाच्या ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाकरिता ५२ मतदान केंद्रांची सुविधा करण्यात आली आहे.

यामध्ये गुरुवारी (दि. १०) १०४९ मतदान कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले. शुक्रवारीही प्रशिक्षणादरम्यान मतदान सुरू राहिले. अद्याप दोन प्रशिक्षण सत्रे होणार आहेत. ती बुधवारी (दि. १६), गुरुवारी (दि. १७), २० व २१आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, या दिवशीही टपाली मतदान सुरू राहणार आहे.

दरम्यान, निवडणूक विभागाकडून सीमेवरील सैनिकांसाठीही मतदानासाठी ८७५३ आॅनलाईन मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्यावर मतदान होऊन त्या चार -पाच दिवसांत निवडणूक विभागाकडे यायला सुरुवात होईल, असे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

झालेले टपाली मतदान असे

विधानसभा मतदारसंघ      टपाली मतदान

  • चंदगड                                  १३२
  • राधानगरी                            ११४
  • कागल                                 २३१
  • कोल्हापूर दक्षिण                   ६३
  • करवीर                                १६१
  • कोल्हापूर उत्तर                    १३
  • शाहूवाडी                               ५७
  • हातकणंगले                       १३७
  • इचलकरंजी                          ५७
  • शिरोळ                                 ८४


सैनिकांसाठी पाठविलेल्या टपाली मतपत्रिका

विधानसभा मतदारसंघ              टपाली मतपत्रिका

  • चंदगड                                      २२५०
  • राधानगरी                                १०८५
  • कागल                                     १८०७
  • कोल्हापूर दक्षिण                        ४९१
  • करवीर                                      ६४८
  • कोल्हापूर उत्तर                          ९६
  • शाहूवाडी                                 १२२३
  • हातकणंगले                              ४०७
  • इचलकरंजी                              १४८
  • शिरोळ                                     ५९८

 

 

Web Title: District polls were held in 19 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.