शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बिद्री कारखान्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईला स्थगिती, गळीत हंगामाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 16:59 IST

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा मोलॅसिस विक्रीचा एम-१ परवाना निलंबनाच्या जिल्हाधिकारी , कोल्हापूर ...

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा मोलॅसिस विक्रीचा एम-१ परवाना निलंबनाच्या जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या आदेशास उत्पादन शुल्क आयुक्तांनी स्थगिती दिली. कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पावरील कारवाईस मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली होती. आता मोलॅसिस विक्रीवरील बंदी हटविल्याने येत्या हंगामात कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पावर उत्पादन शुल्क विभागाने २१ जून २०२४ रोजी रात्रीची तपासणी करत काही त्रुटी दाखविल्या होत्या. याबाबतच्या चौकशी अहवालानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कारखान्याला इथेनॉलचे नव्याने उत्पादन करण्यास व असलेल्या साठ्याची विक्री करण्यास बंदी घातली होती. या निर्णयाविरुद्ध कारखाना प्रशासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. याबाबत विचार करुन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला  स्थगिती दिली आहे. या कमी कारखान्याच्या वतीने अँड. विनायक साळोखे यांनी काम पाहिले.कारखाना कार्यक्षेत्राच सुमारे ११ लाख टन ऊसाची उपलब्धता आहे. कारखान्यावरील कारवाईमुळे पिकविलेल्या ऊसाच्या गाळपावर प्रश्नचिन्ह होते मात्र या निर्णयाने चार तालुक्याच्या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांची चिंता दूर झाली असून तोडणी-ओढणी वाहतूकदार यांच्या करार व ऊस मजूर नोंदनी तसेच सबंधीत सर्वच हंगामपुर्व कामांना गती मिळणार आहे.

कारखान्यातील हंगामपुर्व कामे प्रगतीपथावर असून यंदाचा  हंगाम यशस्वी करण्यासोबतच विक्रमी ऊस गाळप करण्याचे उदिष्ट आहे. कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पातून अधिक अर्थिक सक्षमता प्राप्त करण्याचे उदिष्ट असून यामाध्यमातून ऊस उत्पादकांना चांगला ऊसदर देणेसाठी आम्ही कटिबध्द आहोत. - के. पी. पाटील, अध्यक्ष, बिद्री साखर कारखाना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेcollectorजिल्हाधिकारीK P. Patilके. पी. पाटील