शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतील ‘पी. जी.’चा मार्ग मोकळा

By admin | Updated: July 28, 2015 01:22 IST

सर्वोच्च न्यायालयाने मानसिंग पाटील यांची याचिका फेटाळली

कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या गगनबावडा तालुका प्रतिनिधींच्या ठरावाबाबत काँग्रेसचे मानसिंग पाटील यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पी. जी. शिंदे यांचा बॅँकेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. वादग्रस्त २३ मतांची लवकरच मोजणी प्रक्रिया राबवून निकाल जाहीर केला जाणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गगनबावडा तालुका विकास संस्था गटात ६६ मतदार होते. यापैकी १८ संस्था जिल्हा बँकेच्या थकबाकीदार असल्याने त्यांना मतदान करता येणार नसल्याची हरकत घेत याबाबत मानसिंग पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच मुद्द्यावर शिंदे यांनी पाटील यांच्या पाच संस्थांबाबत याचिका दाखल केली होती. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच यावर सुनावणी होऊन या २३ संस्थांचे मतदान स्वतंत्र घ्यावे व त्याची मतमोजणी करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर उर्वरित ४३ संस्थांच्या मतदानाची मोजणी करावी; पण त्याचा निकाल जाहीर करू नये, असेही आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार या गटातील ४३ मतांची मोजणी करण्यात आली, यामध्ये पाटील यांना २५, तर पी. जी. शिंदे यांना १८ मते मिळाली. त्यामुळे २३ ठरावांबाबत न्यायालय काय निकाल देते, याबाबत उत्सुकता लागली होती. यावर ७ जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी होऊन पाटील यांची याचिका फेटाळून लावली. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली. त्याला उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन पाटील यांची याचिका फेटाळून लावल्याचे समजते. त्यामुळे शिंदे यांचा जिल्हा बॅँकेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २३ मतांची मोजणी आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. ४३ मतांमध्ये सात मतांनी शिंदे मागे असले तरी २३ मतांची मोजणी झाल्यानंतर ते सहा मतांनी विजयी होऊ शकतात. पी. जी. शिंदे यांच्याकडून अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी काम पाहिले. काही मंडळींनी गगनबावडा तालुक्यात चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू केले आहे. विरोधकांनी अनेक आमिषे दाखवून मला थोपविण्यासाठी केलेले प्रयत्न जनतेने धुडकावून लावलेच; शिवाय न्यायदेवतेनेही सत्याच्या बाजूने न्याय दिला. - पी. जी. शिंदेसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत अद्याप मला मिळालेली नाही. निकाल पाहून पुढील कार्यवाही केली जाईल. मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याचा आदेश असल्यास ती प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. - डॉ. महेश कदम (निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा बॅँक)