जिल्हा बँकेची ५ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:23 IST2021-01-23T04:23:29+5:302021-01-23T04:23:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ५ फेब्रुवारी रोजी ...

District Bank General Meeting on 5th February | जिल्हा बँकेची ५ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा

जिल्हा बँकेची ५ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर येथे होणार आहे. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर व्याज माफी देण्याविषयी या सभेत शिक्कामोर्तब होणार आहे.

कोरोनामुळे यंदा सर्वच सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांना मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ दिली आहे. बँकेची निवडणूक मार्चनंतर होणार आहे, तत्पूर्वी सभा घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या सभेत पारंपरिक विषयांवर चर्चा होणार आहे. त्याशिवाय एक ते तीन लाख पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारच्या प्रोत्साहन शिवाय २ टक्के व्याज माफ करण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब होणार आहे.

Web Title: District Bank General Meeting on 5th February