थुंकीमुक्त चळवळीला जिल्हा प्रशासनाचे बळ-जिल्हाधिकारी दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 19:04 IST2021-01-13T19:02:45+5:302021-01-13T19:04:32+5:30
collector AntispitMovement Kolhapur- कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी लोक चळवळीच्या माध्यमातून एक सामाजिक आरोग्याशी संबंधित प्रश्न हाताळला जातोय ही बाब कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासन या चळवळीला सहकार्य करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिली.

अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूर यांच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना चळवळीला सहकार्य करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर : कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी लोक चळवळीच्या माध्यमातून एक सामाजिक आरोग्याशी संबंधित प्रश्न हाताळला जातोय ही बाब कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासन या चळवळीला सहकार्य करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिली.
अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूर यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच मागील चार महिन्यात राबवलेल्या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. यावेळी जनजागृती बरोबरच शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे थुंकीमुक्त क्षेत्र करण्याबाबत व कडक कारवाई करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. जिल्हाधिकारी देसाई यांनी शिक्षकांनी शालेय मुलांमध्ये हा विषय आधीपासूनच सखोलपणे रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. तसेच शिक्षण विभागाला या बाबतीत सूचित केले जाईल असेही म्हणाले.
दिपा शिपुरकर यांनी थुंकण्याची सवय रोग प्रसारासाठी पर्यायाने सार्वजनिक आरोग्याला कशी घातक आहे याची माहिती दिली. राहुल राजशेखर यांनी दंडात्मक कारवाईचे महत्व सांगत प्रशासनाकडून सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी आनंद आगळगांवकर, विजय धर्माधिकारी, सारिका बकरे प्रसाद नरुले, सागर बकरे व राहुल चौधरी उपस्थित होते.