कागलमधील वारकऱ्यांना तुकाराम गाथांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:25+5:302021-02-05T07:03:25+5:30

काररखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. स्वागत कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी केले. प्रास्ताविक ...

Distribution of Tukaram Gathas to Warakaris in Kagal | कागलमधील वारकऱ्यांना तुकाराम गाथांचे वितरण

कागलमधील वारकऱ्यांना तुकाराम गाथांचे वितरण

काररखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

स्वागत कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी केले. प्रास्ताविक ह.भ.प.मधुकर भोसले-बस्तवडेकर यांनी केले. ह.भ.प. पा. रा. पाटील (बस्तवडे), ह.भ.प.सदाशिवराव निकम (सिद्धनेली) ह.भ.प. श्रीकांत पाटील (म्हाकवे), ह.भ.प. चद्रकांत माळवदे (मुरगूड) यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शहाजी पाटील, दत्तात्रय सोनाळकर, दिनकर पाटील, सभापती पूनम महाडिक, राहुल महाडिक तालुक्यातील वारकरी सांप्रदाय व अध्यात्मातील प्रमुख वारकरी, कारखान्याचे संचालक उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

दरवर्षी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू : मंडलिक गतवर्षी मंडलिकांच्या पुण्यतिथीनिमित्त जाधव गुरुजी यांनी निरूपण केलेल्या गाथा घेऊन कागलमधील ८६ गावांमध्ये वाटपाचे निश्चित केले होते. दरवर्षी कारखाना कार्यस्थळावर प्रबोधनात्मक कार्यक्रम (पारायण सोहळा) आयोजित करण्याचा निर्धारही खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.

कॅप्शन सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावर मारूतराव जाधव लिखित तुकाराम गाथा वारकऱ्यांना अर्पण करताना पूर्णानंद काजवे महाराज. यावेळी खासदार संजय मंडलिक, पूनम महाडिक.

छाया-जे.के.फोटो, सुरुपली

Web Title: Distribution of Tukaram Gathas to Warakaris in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.