कोडोली येथे खेलो इंडिया उपक्रमांतर्गत साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST2021-01-08T05:23:09+5:302021-01-08T05:23:09+5:30
कोडोली : येथील कोडोली हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय खेल प्राधिकरण (साई) संचलित ‘खेलो इंडिया’ या ...

कोडोली येथे खेलो इंडिया उपक्रमांतर्गत साहित्य वाटप
कोडोली : येथील कोडोली हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय खेल प्राधिकरण (साई) संचलित ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत खेळाडूंना क्रीडासाहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्याचे वाटप महाराष्ट्र राज्याचे माजी समन्वयक सी. बी. चव्हाण, कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अशोकराव पाटील साई सेंटरचे प्रशिक्षक सतीश पाटील, रवींद्र इंगवले, वसंत पाटील शाळेचे मुख्याध्यापक एम. बी बोरगे सी. बी. शिंदे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळ : कोडोली येथे साई सेंटरच्या खेळाडूना क्रीडासाहित्य वाटप करताना सी. बी. चव्हाण, अशोकराव पाटील, सतीश पाटील व खेळाडू.
०७ कोडोली स्पोर्टस