निर्भया मंचतर्फे धान्य किटचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST2021-06-09T04:28:39+5:302021-06-09T04:28:39+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान निर्भया मंचच्या वतीने एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत शिये येथील करुणालय संस्थेला अन्नधान्याचे वितरण ...

Distribution of grain kits by Nirbhaya Manch | निर्भया मंचतर्फे धान्य किटचे वितरण

निर्भया मंचतर्फे धान्य किटचे वितरण

कोल्हापूर : महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान निर्भया मंचच्या वतीने एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत शिये येथील करुणालय संस्थेला अन्नधान्याचे वितरण करण्यात आले.

संस्थेच्या वतीने कोरोना काळात अपंग, बेरोजगार यांना धान्य वाटप, दवाखान्यातील गरोदर माता, कोविड सेंटरमधील रुग्ण व फिरस्त्यांना जेवण असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांच्या मार्गदर्शनासाठी करुणालय संस्थेस मदत करण्यात आली. यावेळी पूजा आरडे, ॲड. भाग्यश्री पाटील, राणी गायकवाड, स्मिता ओतारी, श्रद्धा पानारी, सारिका सूर्यवंशी, ॲड. मीरा जाधव, स्नेहल राजापूरकर, कादंबरी मोरे, गायत्री चव्हाण, निकिता भंडारी, उल्फत मुल्ला, पूजा मोहिते, गायत्री निकम, राजेश्वरी सावंत उपस्थित होत्या.

--

फोटो नं ०८०६२०२१-कोल-निर्भया मंच

ओळ : कोल्हापुरातील निर्भया मंचच्या वतीने शिये येथील करुणालय संस्थेला अन्नधान्याचे किट देण्यात आले.

--

Web Title: Distribution of grain kits by Nirbhaya Manch