जून महिन्यापर्र्यत घरफाळा भरल्यास नागरीकांना सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 18:03 IST2020-04-17T18:03:17+5:302020-04-17T18:03:52+5:30
कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी कर्मचा-यांच्यावतीने बील पोहच करावीत. मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर देवून सुरक्षित अंतर ठेवून बील वाटप करावे, अशा सूचना त्यांना देण्यात याव्यात.

जून महिन्यापर्र्यत घरफाळा भरल्यास नागरीकांना सवलत
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असून घरफाळा बीलाचे वाटप पोस्टाने नको तर पूर्वीप्रमाणे महापालिकेच्या कर्मचाºयांमार्फत करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक संभाजी जाधव यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जे मिळकतधारक उपलब्ध असणार नाहीत त्यांचीच केवळ बील पोस्टाने पाठवावे, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्यावतीने नागरीकांना जून महिन्यापर्र्यत घरफाळा भरल्यास सवलत आहे. याचा लाभ नागरीकांना होण्यासाठी घरफाळ्याची बील लवकर नागरीकांना मिळणे आवश्यक आहे. कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी कर्मचा-यांच्यावतीने बील पोहच करावीत. मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर देवून सुरक्षित अंतर ठेवून बील वाटप करावे, अशा सूचना त्यांना देण्यात याव्यात.
कोणत्याही दोषाशिवाय आॅनलाईनने कर जमा करण्याची तसेच बील पाहण्याची सुविधा देण्यात यावी. तसेच शहरातील बँकामार्फतही घरफाळा जमा करता येईल का याची जबाबदारी संगणक विभागावर देण्यात यावी, अशी मागणीही नगरसेवक जाधव यांनी केली आहे.