जि. प. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:09+5:302021-03-24T04:23:09+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सर्व विभाग प्राधान्याची भूमिका घेतील, अशी ग्वाही ...

जि. प. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सर्व विभाग प्राधान्याची भूमिका घेतील, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. राजर्षी शाहू सभागृ़हात झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.
१ जानेवारी २०१९ ते ३० जून २०१९ अखेरचा महागाई भत्ता फरक, पंचायत समिती स्तरावरील देयकांबाबत यावेळी संघटना सचिव एम. ए. देसाई यांनी मुद्देनिहाय सविस्तर मांडणी केली. सुधारित निवृत्तीवेतन आणि पदान रक्कम प्राधान्याने अदा करण्याबाबत सूचना मांडण्यात आली. प्रलंबित रजा रोखीकरणाचाही मुद्दा यावेळी चर्चेत आला. आरोग्य, महिला-बालकल्याण या विभागाच्या कर्मचाऱ्यांना दोन, दोन वर्षे आर्थिक लाभ मिळत नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष विश्वास साबळे यांनी प्रास्ताविक करून, त्यामध्ये विविध प्रश्नांचा आढावा घेतला. विश्वनाथ महाजन यांनी आभार मानले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, राहुल कदम व अन्य विभागप्रमुखांनी चर्चेत भाग घेतला.