शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नाही माप, मोफत गणवेशाचा ताप; कापडाचा दर्जाही हलका असल्याने पालकांमधून नाराजी

By पोपट केशव पवार | Updated: July 2, 2024 16:16 IST

राज्य सरकारच्या वतीने शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

पोपट पवारकोल्हापूर : राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेला प्राथमिक शाळांमधील मोफत गणवेश विद्यार्थी व पालकांसाठी डोकेदुखी बनला आहे. शासनाने विद्यार्थ्यांना पुरवलेल्या पहिल्या तयार गणवेशाचे कापड हे अत्यंत हलके असून, गणवेश बिनमापाचा आहे. हा गणवेश विद्यार्थ्यांना व्यवस्थित बसत नसल्याच्या असंख्य तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे हा नवा गणवेश काय कामाचा? असा सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे. राज्य सरकारच्या वतीने शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. याची सुरुवात १५ जूनपासून करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ८३ हजार ७२६ मुले, तर एक लाख ८३ हजार २०२ मुली असे एकूण ३ लाख ६६ हजार ९२८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या असून, या दिवसापासून या गणवेशाचे वाटप सुरू झाले आहे. ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला आहे तेथील बहुतांश विद्यार्थ्यांना हा गणवेश येत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी तो मोठा होत असल्याने या गणवेशाचे करायचे काय, असा प्रश्न शिक्षकांनाही पडला आहे. 

पहिलीच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोठा होत असेल तर तो दुसरीच्या वर्गासाठी दिला जात आहे. बहुतांश शाळांमध्ये चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश नीटसा येत नसल्याने तो तिसरीच्या वर्गासाठी दिला जात आहे. पूर्वी शाळा व्यवस्थापन समितीकडून गणवेशाची खरेदी केली जात होती. त्यामुळे प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे माप घेऊनच तो उपलब्ध करून दिला जात होता. यंदाच्या वर्षापासून राज्य सरकारनेच तयार गणवेश विद्यार्थ्यांना दिले आहेत. विद्यार्थी कितवीच्या वर्गात आहे, यावरून त्याच्या वयोमानाचा अंदाज बांधत गणवेशाचे माप ठरविल्याने हा गोंधळ उडाला आहे.

शासनाने विद्यार्थ्यांना पुरवलेल्या पहिल्या तयार गणवेशाचे कापड हे अत्यंत हलके असून, बिनमापाचे गणवेश दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नीटसे बसतही नाहीत. दुसऱ्या गणवेशासाठी दिलेले कापडही अपुरे असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांना गणवेश होत नाही. तसेच १०० रुपये तुटपुंज्या शिलाईमध्ये कोणीही बचत गट गणवेश शिवून द्यायला तयार नाहीत. त्यामुळे गणवेश कसा शिवून घ्यायचा हा शाळांपुढे प्रश्न आहे. तरी पूर्वीप्रमाणेच गणवेश योजना सुरू ठेवावी व प्रतिविद्यार्थी २ गणवेशासाठी एक हजार रुपये अनुदान मिळावे. - अर्जुन पाटील, अध्यक्ष (पुणे विभाग), महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.पूर्वी शाळा व्यवस्थापन समितीकडून गणवेश खरेदी केली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगाचे माप घेऊनच ही खरेदी होत असल्याने विद्यार्थ्यांना गणवेश व्यवस्थित बसत होता. सरकारने पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे हे अधिकार द्यावेत. -  साताप्पा पाटील, राज्य संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थी