पॅचवर्कला अवकाळी पावसाचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:57+5:302021-01-08T05:15:57+5:30
कोल्हापूर : महापालिका प्रशासनाकडून आज, बुधवारपासून शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या पॅचवर्क कामाला सुरुवात होणार होती. परंतु सोमवारी सायंकाळनंतर जोरदार ...

पॅचवर्कला अवकाळी पावसाचे विघ्न
कोल्हापूर : महापालिका प्रशासनाकडून आज, बुधवारपासून शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या पॅचवर्क कामाला सुरुवात होणार होती. परंतु सोमवारी सायंकाळनंतर जोरदार झालेल्या पावसामुळे या कामाला सुरू होण्यापूर्वीच ब्रेक लागला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी, चार दिवसाने कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून शहरातील खराब रस्ते चर्चेचा विषय ठरत आहेत. महापाालिका निवडणुकीच्या तोंडावर हा विषय राजकीय मुद्दा बनत आहे. नवीन रस्त्यासाठी राज्य शासनाकडे १०० कोटींची मागणी केली आहे. कोरोनामुळे निधी मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तात्पुरता पर्याय म्हणून पॅचवर्कसाठी २ कोटींचा निधी दिला आहे. आज, बुधवारपासून या कामाला सुरुवात होणार होती. मात्र, सोमवारी जोरदार झालेल्या पावसामुळे अडथळा निर्माण झाला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी, दोन दिवसांनी वातावरणाचा अंदाज घेऊन कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली आहे.
फोटो : महापालिकेचा लोगो वापरणे