शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात ठाकरे-शिंदे गटात वाद उफळला, कोल्हापुरात तणाव; अचानक आणून बसविली २१ फुटी मूर्ती

By भारत चव्हाण | Updated: September 21, 2023 14:23 IST

कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणपती प्रतिष्ठापणा करण्यावरून दोन गटातील वाद गुरुवारी पोलीस प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरली. ...

कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणपती प्रतिष्ठापणा करण्यावरून दोन गटातील वाद गुरुवारी पोलीस प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरली. एका गटाने मूर्ती बसविण्याचा आग्रह धरला तर दुसऱ्या गटाने त्याला कडाडून विरोध केला. राज्यातील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे वादाचे पडसाद कोल्हापूर शहरातील गणेशोत्सवात गणेश भक्तांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळात यावर्षी ठाकरे - शिंदे असे दोन गट पडले आहेत. गणपती कोणी बसवायचा यावरून दोन गटात वाद निर्माण झाला. त्यामुळे हे मंडळ ज्या रिक्षा चालकांनी स्थापन केले, त्यांनी गणेशोत्सव साजरा करावा आणि ठाकरे - शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी यात भाग घेऊ नये, असे पोलीस प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत ठरले. दोन्ही गटांनी ते मान्य देखील केले.परंतु अचानक रात्री शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी 21 फुटी मूर्ती मंडपात आणून बसविली. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी गुरुवारी याच मंडपात आपलाही गणपती बसविण्याचा निर्धार केला. त्याला शिंदे गटाने विरोध केला. त्यामुळे वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनलेकार्यकर्त्यांनी सामज्यास्याची भूमिका घ्यावी, उत्सवाला गालबोट लागेल असे वागू नका अशा शब्दात समजावण्याचा पोलिसांनी प्रयत्न केले, पण दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.अशाताच राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर शिवाजी चौकात पोहचले. त्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जोर चढला. घोषणाबाजी सुरु झाली. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक करा, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाSanjay Pawarसंजय पवारRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरPoliceपोलिस