वडणगे येथे दोन कुटुंबात वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST2021-05-24T04:24:08+5:302021-05-24T04:24:08+5:30

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून शेजाऱ्यांत वाद उफाळून दोन्ही कुटुंबांतील सदस्यांत धक्काबुक्कीचा प्रकार घडला. ही घटना वडणगे (ता. करवीर) येथे ...

Dispute between two families at Wadange | वडणगे येथे दोन कुटुंबात वादावादी

वडणगे येथे दोन कुटुंबात वादावादी

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून शेजाऱ्यांत वाद उफाळून दोन्ही कुटुंबांतील सदस्यांत धक्काबुक्कीचा प्रकार घडला. ही घटना वडणगे (ता. करवीर) येथे घडली. या प्रकरणी नंदिनी आनंदा पाटील व श्रावण विष्णू नांगरे यांनी रविवारी करवीर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटील व नांगरे ही दोन कुटुंबे वडणगे येथे शेजारी-शेजारी राहतात. त्यांच्यात काही वर्षांपासून वाद आहे. पाटील यांचा मुलगा हा नांगरे यांचा मित्र असल्याने तो नेहमीच त्यांच्या घरी असतो. याच कारणांवरून नंदिनी पाटील ह्या नांगरे यांच्या घरी गेल्या. तेथे वादावादी झाली. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नांगरे यांनी मारहाण केली व अंगावरील ६७ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या प्रकरणी श्रावण नांगरे, विश्वास पोवार यांच्यावर गुन्हा नोंदविला.

श्रावण नांगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, ते घरात पत्नीसोबत जेवण करीत असताना नंदिनी पाटील व आनंदा पाटील यांनी घरात येऊन जातिवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पाटील दाम्पत्यावर करवीर पोलीस ठाण्यात जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Dispute between two families at Wadange