शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
2
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
3
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
4
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
5
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
6
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
7
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
8
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
9
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
10
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
11
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
12
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
13
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
14
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
16
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
17
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
18
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
19
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
20
तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मृत अर्भकांची शेतात विल्हेवाट; कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुके गर्भपाताचे 'हॉटस्पॉट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:05 IST

पट्टणकोडोलीत महिला डॉक्टरकडून गर्भपात

उद्धव गोडसेकोल्हापूर : पोलिस आणि आरोग्य विभागाकडून वारंवार कारवाई होऊनही जिल्ह्यात गर्भपाताचे अड्डे राजरोस सुरू आहेत. यातही संपूर्ण राधानगरी तालुक्यासह मलकापूर आणि पट्टणकोडोली हॉटस्पॉट बनले आहेत. कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन ठराविक टोळ्यांनी त्यांचे गोरखधंदे सुरूच ठेवले आहेत. विशेष म्हणजे यात काही डॉक्टरांचाही समावेश असल्याने याचे गांभीर्य वाढले आहे.बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रोखण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रबोधन आणि उपाययोजना केल्या जात असल्या तरी हा प्रकार राजरोस सुरूच आहे. वंशाला दिवा हवा, या अट्टहासातून गर्भातच कळ्या खुडल्या जात आहेत. गेल्या वर्षभरात कळंबा येथील एक महिला डॉक्टर या गुन्ह्यात सापडल्या. फुलेवाडी येथील एका बोगस डॉक्टरने गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचे उघडकीस आले. जुना बुधवार पेठेतील एका घरात सोनोग्राफी मशीन मिळाले.क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे छापा टाकून केलेल्या कारवाईत स्वप्निल केरबा पाटील हा बोगस डॉक्टर सापडला. याशिवाय राधानगरी, मुरगुड, कोडोली येथेही कारवाया झाल्या. मात्र, गर्भपाताचे अड्डे बंद झाले नाहीत. उलट गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात करण्याचे दर वाढले. यातून अनेक एजंट आणि डॉक्टरांचे उखळ पांढरे झाले आहे.मलकापुरातील डॉक्टर पुन्हा सक्रियशाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे एका डॉक्टरवर दीड वर्षांपूर्वी कारवाई झाली होती. त्यावेळी त्याचा परवाना रद्द करण्यात आला. आता तो राजकीय ताकद वापरून पुन्हा परवाना मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय सेवेचा परवाना नसतानाही तो दुसऱ्या डॉक्टरच्या रुग्णालयात बसून गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचे काम करीत असल्याची माहिती परिसरातून मिळाली.

पट्टणकोडोलीत महिला डॉक्टरकडून गर्भपातपट्टाणकोडोली येथे एक महिला डॉक्टर गर्भपाताचा अड्डा चालवते. तिच्याकडे कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातून आणि सीमाभागातून रोज १० ते १५ रुग्ण येतात. त्यांच्याकडून गर्भपातासाठी ४० ते ५० हजार रुपये घेतले जातात. अनेक डॉक्टरांचाही या रॅकेटमध्ये सहभाग आहे.गर्भपातानंतर विल्हेवाटगर्भपात केल्यानंतर हॉस्पिटलकडून मृत अर्भकांची वैद्यकीय कचऱ्यातून विल्हेवाट लावली जाते. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मागणी असल्यास अर्भक त्यांच्याकडे सोपवले जाते. त्यांच्याकडून ते शेतात दफन केले जाते.. असे सांगणाऱ्या मलकापुरातील एका डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. असे डॉक्टर वैद्यकीय पेशाला कलंक लावत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fetal Disposal in Fields: Kolhapur Abortion Hotspot, Four Talukas

Web Summary : Kolhapur faces rampant illegal abortions, especially in Radhanagari, Malkapur, and Pattan Kodoli. Doctors are involved, exploiting legal loopholes. After abortions, fetuses are secretly disposed of in fields. A doctor's video exposed the practice.