शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

हेरिटेज समिती बरखास्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोल्हापूर हे पौराणिक, ऐतिहासिक वास्तूंचे शहर आहे. मात्र हेरिटेज समितीचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक वास्तू जमीनदोस्त झाल्या, ...

कोल्हापूर : कोल्हापूर हे पौराणिक, ऐतिहासिक वास्तूंचे शहर आहे. मात्र हेरिटेज समितीचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक वास्तू जमीनदोस्त झाल्या, काही वास्तूंची दुरवस्था आहे तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तरी कोल्हापूर शहरातील सध्याची अकार्यक्षम हेरिटेज समिती बरखास्त करून नवीन तज्ञांची नियुक्ती करावी, अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी उपायुक्त निखिल मोरे यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील ग्रेड १मधील शाहू मिलमध्ये अद्याप स्मारक उभारणीचे काम सुरू झालेले नाही. शाहू जन्मस्थळचे काम सुमार झाले आहे व उर्वरित काम रखडले आहे, करवीर नगर वाचन मंदिरचे प्रिन्स शिवाजी हॉल जमीनदोस्त झाले, शालिनी पॅलेस ही ऐतिहासिक वास्तू कित्येक वर्षे बंदावस्थेत आहे. भवानी मंडप परिसराला टपऱ्या आणि अतिक्रमणाने वेढले आहे. जयप्रभा स्टुडिओ, राजाज्ञा वाडा, महागांवकर बंगला, शालिनी सिनेटोन या वास्तू नामशेष झाल्या. या वास्तूंचे जतन संवर्धनाची जबाबदारी हेरिटेज समितीची असून जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पदाधिकाऱ्यांना या कामाचा पूर्वानुभव नाही, या परंपरेशी काही देणे घेणे नाही, तरी सध्याची अकार्यक्षम हेरीटेज समिती बरखास्त करून नवीन तज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी. निवेदनावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, रविराज कदम, राम यादव, अमित आडसुळे यांच्या सह्या आहेत.

--

फोटो नं १२०४२०२१-कोल-हेरिटेज कमिटी

ओळ : कोल्हापुरातील इतिहासप्रेमींनी सोमवारी उपायुक्त निखिल मोरे यांना हेरीटेज समिती बरखास्त करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

--