चंदगड : महायुतीतील घटक पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चंदगड नगरपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये भाजपासोबतराष्ट्रवादी काँग्रेसने यावे यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी मुंबई व कोल्हापूर अशी दोनवेळा चर्चा केली. पण, त्यांनीच स्पष्ट न सांगता पुन्हा यावर बसून निर्णय घेऊ, असे सांगून मला गाफील ठेवले आणि त्यांच्या मनातील नैसर्गिक युती केल्याची प्रतिक्रिया आमदार शिवाजी पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील व शरदचंद्र पवार गटाच्या डॉ. नंदिनी बाभूळकर हे दोन्ही गट एकत्र आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी युतीविषयी चर्चा केली नाही, असे सांगितले. याचे स्पष्टीकरण देताना पाटील यांनी मत मांडले.
वाचा: भाजप बोलेना म्हणूनच शरद पवार पक्षाशी आघाडी - हसन मुश्रीफआमदार पाटील म्हणाले, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीत युतीसाठी स्वतःहून मुश्रीफ यांच्याशी प्रयत्न केले. पण, त्यांनी स्पष्ट संकेत न देता मला चर्चेत ठेवून आपली नैसर्गिक युती सोमवारी केली. त्यांना शुभेच्छा असून समविचारींना सोबत घेऊन भाजपाच्या झेंड्याखाली नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने लढवून जिंकणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
Web Summary : MLA Patil states Mushrif kept him engaged in alliance talks for local elections but ultimately formed a natural alliance without informing him. Patil expresses his intent to contest upcoming elections under the BJP banner.
Web Summary : विधायक पाटिल का कहना है कि मुश्रीफ ने स्थानीय चुनावों के लिए गठबंधन वार्ता में उन्हें व्यस्त रखा, लेकिन अंततः उन्हें सूचित किए बिना एक प्राकृतिक गठबंधन बना लिया। पाटिल ने भाजपा के झंडे तले आगामी चुनाव लड़ने का इरादा जताया।