शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा, प्रदेश काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

By राजाराम लोंढे | Updated: February 8, 2023 13:09 IST

ज्यावेळी काँग्रेस हरत होती, त्यावेळी पाटील हे काँग्रेसला विजय मिळवून देत होते

राजाराम लोंढेकोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकांवरून प्रदेश काँग्रेसमधील खदखदीतून प्रदेशाध्यक्ष बदलाच्या घडामोडी वेगावल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुण, आक्रमक चेहरा म्हणून आमदार सतेज पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजकीय मुत्सद्दीपणा व राज्यभर नेतृत्व करण्याची क्षमता व काँग्रेसला जिंकण्याची सवय लावणारा नेता म्हणून त्यांची काँग्रेसमध्ये ओळख आहेच, त्याचबरेाबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशाेकराव चव्हाण व बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याने त्यांना संधी मिळू शकते.नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचे बंड, पक्षाच्या ‘एबी’ फॉर्मचा झालेला घोळ त्यातून झालेला खुलासा व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची नाराजी पाहता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले यांना बाजूला केले जाण्याची शक्यता काँग्रेस वर्तुळातून वर्तवली जात आहे. अशावेळी राज्यभरातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्यासह सतेज पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.ज्येष्ठत्वाचा विचार केला तर अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण व वडेट्टीवार यांच्यापैकी एक नाव निश्चित होऊ शकते; पण काँग्रेसअंतर्गत गटातटाचे राजकारण पाहिले तर एकमेकांच्या नावाला विरोधही होऊ शकतो. अशा वेळी तरुण व आक्रमक चेहऱ्यावर विचार होऊ शकतो. असे झाले तर सुनील केदार व सतेज पाटील यांची नावे पुढे येतात. पश्चिम महाराष्ट्रातील आक्रमक व मुत्सद्दी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत दहा पैकी चार आमदार निवडून आणलेच त्याचबरोबर पुणे शिक्षक मतदार संघातून प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी केल्याने त्यांच्या राजकीय मुत्सद्दीगिरीवर शिक्कामोर्तब झाले.ज्यावेळी काँग्रेस हरत होती, त्यावेळी पाटील हे काँग्रेसला विजय मिळवून देत होते. आगामी दाेन वर्षे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. अशावेळी प्रादेशिक व जातीय समीकरणे पाहता सतेज पाटील यांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

संधी मिळण्याची शक्यता का?

  • कोणतीही निवडणूक हातात घेतली की गुलाल घेऊनच मागे येण्याची ताकद
  • संघटनकौशल्य व कार्यकर्त्यांचे मोहळ असलेला तगडा नेता
  • युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत चांगला समन्वय
  • ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चांगले संबंध
  • आमचं ठरलंय भूमिकेमुळे राज्यभर चर्चा
टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील