प्रेमवीराने रस्त्यावर लिहिलेल्या संदेशाची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:44+5:302021-03-24T04:23:44+5:30
जयसिंगपूर : कशासाठी प्रेमासाठी... त्याने तब्बल अडीच किलोमीटर रस्त्यावर लिहिले प्रेमाचे संदेश... प्रेमाचा हा प्रकार शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती-जयसिंगपूर मार्गावर ...

प्रेमवीराने रस्त्यावर लिहिलेल्या संदेशाची चर्चा
जयसिंगपूर : कशासाठी प्रेमासाठी... त्याने तब्बल अडीच किलोमीटर रस्त्यावर लिहिले प्रेमाचे संदेश... प्रेमाचा हा प्रकार शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती-जयसिंगपूर मार्गावर उघडकीस आला. तब्बल अडीच किलोमीटर रस्त्यावर ‘आय लव्ह यू’ व ‘आय मिस यू’ असे ऑईल पेंटनेच लिहिलेले वाक्य चर्चेचा विषय ठरल्यानंतर मंगळवारी या प्रकाराची धरणगुत्ती ग्रामपंचायतीने गंभीर दखल घेतली. रस्त्यावर रेखाटलेले हे शब्द ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पुन्हा ऑईलपेंटने पुसून टाकले. दरम्यान, रस्त्यावर शब्द रेखाटणाऱ्या व्यक्तीचा पोलीस व सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला जात आहे.
याबाबत माहिती अशी की, शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती-जयसिंगपूर सुमारे अडीच किलोमीटर डांबरी रस्त्यावर पांढऱ्या ऑईल पेंटने पाच फूट अंतराने ‘आय लव्ह यू’ व ‘आय मिस यू’ अशी वाक्ये लिहिण्यात आली होती. धरणगुत्तीपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत संबंधित तरुणाने आपल्या प्रेमाचे लिखाण केल्याचा प्रकार दिसून आला. सोशल मीडियावर रस्त्यावर लिहिलेले वाक्य व्हायरल झाल्यानंतर चर्चेचा विषय बनला होता. प्रेमाचा आगळावेगळा प्रकार यानिमित्ताने पुढे आला असला तरी धरणगुत्ती ग्रामपंचायतीने याची दखल घेत दोघा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रस्त्यावर लिहिलेली वाक्ये ऑईल पेंटनेच पुसून टाकली आहेत. प्रेमवीराने अशा प्रकारे रस्त्यावर लिहिलेली वाक्ये गैरप्रकार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. दरम्यान, हा प्रेमवीर कोण, याचा तपासासाठी पोलीस यंत्रणा देखील सक्रिय झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासयंत्रणा गतिमान करण्यात आली आहे.
फोटो - २३०३२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती-जयसिंगपूर रस्त्यावर प्रेमवीराने लिहिलेला प्रेमसंदेश. तर दुसऱ्या छायाचित्रात मंगळवारी धरणगुत्ती ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी ती वाक्ये ऑईलपेंटने पुसून टाकली.