समाजकल्याण अधिकाऱ्याच्या स्वागताची कोल्हापुरात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST2020-12-24T04:22:45+5:302020-12-24T04:22:45+5:30
येथील विचारे माळ येथील समाजकल्याण विभागाच्या सहायक आयु्क्तपदी विशाल लोंढे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील बाळासाहेब ...

समाजकल्याण अधिकाऱ्याच्या स्वागताची कोल्हापुरात चर्चा
येथील विचारे माळ येथील समाजकल्याण विभागाच्या सहायक आयु्क्तपदी विशाल लोंढे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील बाळासाहेब कामत यांना अजूनही पदस्थापना देण्यात आली नाही. लोंढे याआधीही कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे जिल्ह्यात अनेकांशी चांगले संबंध आहेत. लोंढे सकाळी ११ नंतर पुण्याहून कार्यभार स्वीकारण्यासाठी आले.
यावेळी ढोल-ताशांच्या गजरामध्ये गुलाबी फेटा बांधून कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. काही उत्साहींनी त्यांना खांद्यावरून कार्यालयाकडे नेले. यावेळी मोठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र, याच परिसरातील काही नागरिकांनी शासन एकीकडे फटाक्यांवर बंदी घालत असताना शासकीय अधिकाऱ्यांच्या स्वागताला फटाके कसे वाजविले जातात असा सवाल केला. याच्या चित्रफिती आणि छायाचित्रे दिवसभर समाजमाध्यमावर फिरत होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोंढे चर्चेत आले आहेत.
२३१२२०२० कोल विशाल लोंढे
समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या स्वागतासाठी फटाक्यांचा असा धूर काढण्यात आला.