शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे वाढ देणाऱ्यांबरोबर चर्चा करा

By admin | Updated: September 7, 2015 00:14 IST

किमान वेतन प्रश्न : ए. बी. पाटील यांचे आवाहन; अन्यथा आंदोलन चालूच राहाणार

इचलकरंजी : जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेल्या ५०० रुपयांपेक्षा जास्त वाढ देण्यास तयार असलेल्या कारखानदारांबरोबर कामगारांनी चर्चा करावी. त्यांच्यात ठरलेला तोडगा कामगार संघटनेला कळवावा आणि कारखानदार, कामगार व संघटना यांच्यात बोलणी झाल्यानंतरच सायझिंग कारखाने चालू करावेत. अन्यत्र मात्र उच्च न्यायालयाच्या निकालाला अधीन राहून बेमुदत संप सुरूच राहील, अशी घोषणा सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या मेळाव्यात कामगार नेते ए. बी. पाटील यांनी केली.येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवनात काल, शनिवारी जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी घेतलेल्या बैठकीनंतर कामगार संघटनेने थोरात चौकात कामगारांचा रविवारी मेळावा आयोजित केला होता. पाटील म्हणाले, २७ वर्षे जाहीर न झालेले सन २०१३ मधील किमान वेतनाचे ड्राफ्ट नोटिफिकेशन सरकारने दाबून ठेवले होते; पण लाल बावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बडगा उगारताच सुधारित किमान वेतन बाहेर आले. सरकारनेच जाहीर केलेल्या किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी कामगारांनी संप केला आहे. सायझिंगधारक आमच्याशी चर्चाच करीत नाहीत. आम्ही चर्चेसाठी केव्हाही तयार आहोत. कालच्या बैठकीत काही मोजकेच वगळता बाकी सर्व कामगार संघटनेवर दबाव टाकण्यासाठीच आले होते. त्यांच्याकडून संप मागे घ्या आणि गाव चालू करूया, असा वारंवार आग्रह होता, असाही आरोप केला. या मेळाव्यात आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, मनोहर ढवळे, आदींची भाषणे झाली.(प्रतिनिधी)कामगाराचा मालक आणि ‘काडीपेटी’आम्ही कामगारांचे मालक झालोय, असे म्हणणाऱ्या सायझिंग मालकाच्या पुढाऱ्याने लक्षात ठेवावे की, भले कामगाराचा मालक झाला की त्याची नीती बदलते आणि तो मालक पिळवणूक करूनच मोठा होतो, अशी टीका पाटील यांनी केली. तर एक मालक पुढारी तर खिशातून ‘काडीपेटी’ घेऊनच फिरतोय, अशी खिल्ली उडवित तो जाईल तिथे काडी ओढून पेटवित सुटतोय, असे त्यांनी म्हटले.