बडगा दाखवून शिस्त निर्माण करता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:01+5:302021-01-13T05:05:01+5:30

चंदगड : शिस्त असेल तर चुका होणार नाहीत. बडगा दाखवून शिस्त निर्माण करता येत नाही. स्वत:वर बंधने घालून स्वयंशिस्त ...

Discipline cannot be created by showing badga | बडगा दाखवून शिस्त निर्माण करता येत नाही

बडगा दाखवून शिस्त निर्माण करता येत नाही

चंदगड : शिस्त असेल तर चुका होणार नाहीत. बडगा दाखवून शिस्त निर्माण करता येत नाही. स्वत:वर बंधने घालून स्वयंशिस्त निर्माण करा, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी केले.

चंदगड येथे न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताहात ते बोलत होते.

प्राचार्य आर. आय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सामाजिक स्थैर्यात पोलिसांची भूमिका, त्यांचे कार्य, लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोना योध्ये बनून त्यांनी केलेली सेवा याविषयी माहिती देऊन महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताहानिमित्त सर्व पोलीस बांधवांना शुभेच्छा दिल्या.

पोलीस निरीक्षक तळेकर यांनी कायदा तोडणे म्हणजे काय? गुन्ह्यांचे दखल व अदखलपात्र गुन्हे कोणते, वाहतुकीचे नियम, लायसन्स, इन्शुरन्स, वाहनांचे पेपर, त्यांचे महत्त्व, माहिलांची छेडछाड, विद्यार्थ्यांकडून घडणारे गुन्हे याविषयी माहिती दिली.

फौजदारी कायद्यातील वेगवेगळ्या कलमांची माहिती दिली. एखाद्यावर अन्याय झाला असेल तर मध्यस्थ अथवा एजंटाकडे मदतीची भीक न मागता सरळ पोलीस स्टेशनला येऊन भेटा.

यावेळी उपप्राचार्य ए. जी. बोकडे, रावसाहेब कसेकर, राज किल्लेदार, सूर्यकांत सुतार आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. प्रा. अर्चना रेळेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर पर्यवेक्षक एस. जी. सातवणेकर यांनी आभार मानले.

-------------------------

फोटो ओळी : पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना प्राचार्य आर. आय. पाटील. शेजारी उपमुख्याध्यापक बोकडे, सातवणेकर आदी उपस्थित होते.

क्रमांक : १२०१२०२१-गड-०१

Web Title: Discipline cannot be created by showing badga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.