शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पतीच्या आत्महत्येने निराश पत्नीनेही केली आत्महत्या, प्रेमविवाह करुन झाले होते अवघे काही महिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:14 IST

इचलकरंजी : प्रेमविवाह केलेल्या जोडप्यातील पतीने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. या नैराश्यातून बुधवारी पत्नीनेही गळफास घेऊन आपली जीवन यात्रा ...

इचलकरंजी : प्रेमविवाह केलेल्या जोडप्यातील पतीने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. या नैराश्यातून बुधवारी पत्नीनेही गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. आरोशी प्रणव पारखे (वय १९, रा. श्रीरामनगर, तारदाळ) असे मृत युवतीचे नाव आहे. याबाबत अमर शंकर मोटे (४३, रा. तारदाळ) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे.तारदाळ (ता. हातकणंगले) येथील आरोशी हिचा प्रणव पारखे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर पारखे कुटुंबीय कोल्हापूरला राहण्यासाठी गेले. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत प्रणव याने आत्महत्या केली. पतीच्या मृत्यूमुळे आरोशी कोल्हापूरहून माहेरी तारदाळ येथे येऊन आई-वडिलांसोबत वास्तव्यास सुरुवात केली होती.

पती प्रणव यांच्या आत्महत्येला अवघे तीन महिने उलटले. या कालावधीत नैराश्यातून खचलेल्या आरोशी हिने बुधवारी दुपारी आई-वडील कामावर गेल्यानंतर घरात कोणी नसल्याचे पाहून प्रथम डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने तिने घराच्या स्लॅबवरील लोखंडी हुकास दोरी बांधून गळफास घेतला. दुपारी आई घरी आल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने तिने खिडकीतून पाहिले असता आरोशीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडून तिला खाली उतरवण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी पंचनामा केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी