शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या परीक्षेवेळीच गुरुजींना निवडणूक प्रशिक्षण; विद्यार्थ्यांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 12:02 IST

परीक्षेच्या वेळेतही केला बदल, पालक हतबल

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविण्यासाठी सरकारच्या पातळीवर विविध योजना आणल्या जात असताना दुसरीकडे मात्र याच यंत्रणेकडून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचाही प्रकार घडत असल्याचा प्रत्यय येत आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या मूल्यमापन चाचणी-२ (पॅट) परीक्षेच्या कालावधीतच शिक्षकांचे निवडणुकीचे प्रशिक्षण ठेवल्याने विद्यार्थ्यांसह पालकही हतबल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळांमधील शिक्षकांसाठी येत्या ४ ते ७ एप्रिल या कालावधीत केशवराव भोसले नाट्यगृहात निवडणूक प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. याच कालावधीत शिक्षण विभागाकडून घेण्यात येणारी पॅट संकलित मूल्यमापन चाचणी-२ परीक्षा आहे. मात्र, या परीक्षा सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत घेऊन संबंधित शिक्षकांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहावे, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. वास्तविक या परीक्षा सकाळी ८.३० पासून सुरू होणार होत्या. शिक्षकांच्या निवडणूक प्रशिक्षणासाठी त्याची वेळ एक तास आधी घेतली आहे. केवळ निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी इतक्या सकाळी विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन प्रशासनाने त्यांची ससेहोलपट सुरू केली आहे. अनेक शिक्षकांचे ६ एप्रिलला प्रशिक्षण आहे. याच दिवशी मूल्यमापन चाचणी २ या परीक्षेचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची की प्रशिक्षण करायचे, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे.

प्रशिक्षणाची तारीख बदलाविद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन प्रशिक्षणाच्या ठिकाणी पोहोचणे शिक्षकांसाठी अति धावपळीचे ठरणार आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी तर ही कसरत असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर प्रशिक्षण घ्या अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.त्या कर्मचाऱ्यांनाही मिळेना सूटअपंग, गंभीर आजारी स्तनदा माता यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेऊ नये अशा आयोगाच्या सूचना आहेत. मात्र, जिल्ह्यातील अशा बहुतांश कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. अशा कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षाकडे धावही घेतली. पण त्यांचे म्हणणेच ऐकून घेतले जात नसल्याने हे कर्मचारी हतबल झाले आहेत.

अपंग, गंभीर आजारी स्तनदा माता यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेऊ नये अशा आयोगाच्या सूचना आहेत. मात्र, प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तक्रार केली तर ऐकून घेतले जात नाही. -अर्जुन पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुणे विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकTeacherशिक्षकStudentविद्यार्थी