दिव्यांगांना सहानुभूती नको, सहकार्य हवे : सोनाली नवांगुळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:00 IST2019-12-06T11:57:18+5:302019-12-06T12:00:14+5:30
दिव्यांगांना स्वावलंबनासाठी समाजाच्या सहानुभूतीची आवश्यकता नसते, तर त्यांना सहकार्य अपेक्षित असते, असे प्रतिपादन लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केले.

कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालय, मराठी विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सोनाली नवांगुळ. शेजारी डॉ. आर. के. शानेदिवाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर : दिव्यांगांना स्वावलंबनासाठी समाजाच्या सहानुभूतीची आवश्यकता नसते, तर त्यांना सहकार्य अपेक्षित असते, असे प्रतिपादन लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केले.
शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते.
कार्यक्रमात स्वप्निल संजय पाटील, शुक्ला साताप्पा बिडकर, ओंकार भिकाजी भोसले, उज्ज्वला रामदास सनके, अनिकेत भगवान माने, प्रथमेश सुनील कांबळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात डॉ. डी. के. वळवी यांनी स्वागत केले. डॉ. रचना माने पाहुण्यांची ओळख करून दिली; तर डॉ. पल्लवी कोडक यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. सरोज पाटील, डॉ. सुनीता राठोड, प्रा. व्ही. व्ही. उरुणकर, डॉ. नीता काशीद-पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. प्रशांत मोटे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मानसिंग विजयराव बोंद्रे, मानद सचिव विजयराव श्रीपतराव बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.