भगवान महावीर सेवा रुग्णालयात डिजिटल एक्स-रे शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 05:31 PM2021-06-21T17:31:44+5:302021-06-21T17:33:08+5:30

Hospital Kolhapur : कोल्हापूर येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत चालविण्यात येणाऱ्या सेवार्थ रुग्णालयात लॅबोरेटरीसोबत आता माफक दरामधे डिजिटल एक्स-रे ही सुविधा उपलब्ध झाली असून या डिजिटल एक्स-रे मशिनचे उद्घाटन सोमवारी सातारा येथील शुभदा सुभाष दोशी यांच्या हस्ते झाले.

Digital X-ray launch at Bhagwan Mahavir Seva Hospital | भगवान महावीर सेवा रुग्णालयात डिजिटल एक्स-रे शुभारंभ

 कोल्हापूर येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत चालविण्यात येणाऱ्या सेवार्थ रुग्णालयातील डिजिटल एक्स-रे मशिनचे उद्घाटन सोमवारी सातारा येथील शुभदा सुभाष दोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी आचार्यदेव श्री महासेन सूरीश्वरजी महाराज उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देभगवान महावीर सेवा रुग्णालयात डिजिटल एक्स-रे शुभारंभअतिशय माफक दरात डिजिटल एक्स-रे सेवा उपलब्ध

कोल्हापूर : येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत चालविण्यात येणाऱ्या सेवार्थ रुग्णालयात लॅबोरेटरीसोबत आता माफक दरामधे डिजिटल एक्स-रे ही सुविधा उपलब्ध झाली असून या डिजिटल एक्स-रे मशिनचे उद्घाटन सोमवारी सातारा येथील शुभदा सुभाष दोशी यांच्या हस्ते झाले.

गुजरी येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत गुजरी येथे सेवार्थ रुग्णालय चालविले जाते. येथे अतिशय माफक दरात रुग्णांची तपासणी केली जाते तसेच येथील प्रयोगशाळेत विविध चाचण्या कमी खर्चात केल्या जातात. आता कोल्हापूर विभागातील पहिले डिजिटल एक्स-रे मशिन महावीर सेवा धाम येथे सर्वांच्या सेवेकरिता उपलब्ध झाले असून ही सेवाही अतिशय माफक दरात उपलब्ध झाली आहे.

येथील महावीर सेवा धामच्या सभागृहात झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात सातारा येथील लाभार्थी परिवार शुभदा सुभाष दोशी यांच्या हस्ते या डिजिटल एक्स-रे मशिनचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आचार्यदेव श्री महासेन सूरीश्वरजी महाराज उपस्थित होते. जगभरात कोरोनासारख्या महामारीने समाज त्रासलेला असताना सेवा धाममार्फत सुरु असलेले हे मानव सेवेचे कार्य असेच अखंड चालू राहू दे असा आशिर्वाद यावेळी महाराजांनी दिला. गणिवर्य विक्रमसेन महाराज आणि साध्वीजी ऋजूप्रज्ञाश्रीजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

या प्रसंगी सातारा येथील सुभाष दोशी, प्रफुल्ल दोशी परिवार, शा अंबालालजी राठोड परिवार, डॉ. मनाली बाफना, डॉ. वरूण बाफना, सीमंधर कोविड केअरचे ट्रस्टी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महावीर सेवा धामचे अध्यक्ष विनोद ओसवाल, नरेंद्र राठोड, अमर गांधी, दिलिप गांधी, प्रवीणभाई मणियार, वसंतभाई शाह तसेच महावीर सेवा धामचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Digital X-ray launch at Bhagwan Mahavir Seva Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.