शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नृसिंहवाडी-कुरुंदवाड मार्गावर डिझेल टँकरला आग, ..अन् मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 13:49 IST

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी: नृसिंहवाडी-कुरुंदवाड मार्गावर भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरला आज दुपारी अचानक आग लागली. ग्रामस्थांच्या सतर्कतेने आणि कुरुंदवाड अग्निशामक ...

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी: नृसिंहवाडी-कुरुंदवाड मार्गावर भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरला आज दुपारी अचानक आग लागली. ग्रामस्थांच्या सतर्कतेने आणि कुरुंदवाड अग्निशामक दलाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुरुंदवाड आगाराच्या डेपोला डिझेल पुरवठा करण्यासाठी तारा पेट्रोल पंपाहून (MH04-HD-3739) हा टँकर निघाला होता. मात्र हॉटेल ड्रीम व्हिलेज जवळ आल्यावर टँकरच्या मागील बाजूस टायरीला अचानक आग लागली.शिवराज जाधव, सुशील बहुलेकर, अमोल पाटोळे, गणेश जाधव, राहुल बरगाले, प्रसाद गतारे आदी ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत धाडसाने वाळू व पाण्याचा फवारा सुरू केला. मोरबाळे यांच्या मोकळ्या जागेत टँकर लावण्यात आला. दरम्यान, कुरुंदवाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी दाखल होताच आग आटोक्यात आली व मोठा अनर्थ टळला. यावेळी परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..संबंधित आग लागलेला टँकर हा कुरुंदवाड आगाराच्या डेपोकडे जात होता. मात्र याबाबत आगार प्रमुख नामदेव पतंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. टँकरमध्ये अग्निरोधक उपकरण नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. एवढा मोठा अनर्थ घडतो मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नाही व त्याबाबत आगारप्रमुखांना माहिती नसणे, हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सागर मोरबाळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग