कोल्हापूरात फुटबॉल प्रेमी उभारणार दिएगो मॅराडोनाचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 18:57 IST2021-01-06T18:49:04+5:302021-01-06T18:57:12+5:30

Football Kolhapur- कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनचे चीफ पेट्रन शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसांनिमित्त सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्युट(साई) व फुटबॉल महासंग्राम तर्फे विख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे स्मारक व सॉकर थीम पार्क व ८ ते १४ वर्षाखालील खेळाडूंकरीता व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षण केंद्र साकारला जाणार आहे. अशी माहिती साई चे सतीश सुर्यवंशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

Diego Maradona's memorial to be erected by football fans in Kolhapur | कोल्हापूरात फुटबॉल प्रेमी उभारणार दिएगो मॅराडोनाचे स्मारक

कोल्हापूरात फुटबॉल प्रेमी उभारणार दिएगो मॅराडोनाचे स्मारक

ठळक मुद्देकोल्हापूरात फुटबॉल प्रेमी उभारणार दिएगो मॅराडोनाचे स्मारक फुटबॉलच्या प्रसार आणि प्रचारासाठी थीम पार्कची संकल्पना : सतीश सुर्यवंशी

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनचे चीफ पेट्रन शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसांनिमित्त सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्युट(साई) व फुटबॉल महासंग्राम तर्फे विख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे स्मारक व सॉकर थीम पार्क व ८ ते १४ वर्षाखालील खेळाडूंकरीता व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षण केंद्र साकारला जाणार आहे. अशी माहिती साई चे सतीश सुर्यवंशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

सुर्यवंशी म्हणाले, जगातील फुटबॉल प्रेमींच्या ह्दयात स्थान असलेला अर्जेटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. फुटबॉल वेड्या कोल्हापूरातही त्याचे असंख्य चाहते आहेत. मॅराडोनाच्या प्रेमापोटी असंख्य चाहत्यांची इच्छेखातर कोल्हापूरातही त्याचे पुतळ्याच्या रुपात स्मारक उभे केले जाणार आहे. त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

कोलकत्ता, गोवा यानंतर तिसरी फुटबॉल पंढरी म्हणून कोल्हापूरकडे पाहीले जाते. त्यामुळे कोल्हापूरचा प्रसार आणि प्रचार व्हावा. या उद्देशाने थीम पार्क उभा केला जाणार आहे. यात जगप्रसिद्ध मेस्सी, नेमार, आदी खेळाडूंचे शिल्प येथे असणार आहेत. विशिष्ट प्रकारचा सेल्फी पॉईट, खेळणी, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, वॉकींग ट्रॅक आदींचा समावेश असणार आहे.

फुटबॉल सातासमुद्रापार जावा. याकरीता ८ ते १४ वर्षाखालील मुला-मुलींकरीता प्रोफेशन (व्यावसायिक प्रशिक्षण अकादमी सुरु केली जाणार आहे. यावेळी संताजी भोसले, प्रशांत पवार, योगेश घोरपडे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Diego Maradona's memorial to be erected by football fans in Kolhapur