शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री व्हायचं नव्हतं --तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला

By admin | Updated: December 3, 2014 00:23 IST

सुकन्या कुलकर्णी : प्रकट मुलाखत खुलली

कोल्हापूर : अभिनेत्री व्हायचं नव्हतं, बँकेत नोकरी करायची किंवा शिक्षिकेची नोकरी एवढाच विचार लहानपणी डोक्यात होता. अनवधानाने नाटक क्षेत्रात आले... ‘दुर्गा गौरी’ हे पहिले नाटक.. पण ‘झुलवा’ या वामन केंद्रेंच्या देवदासींवरील नाटकामध्ये जगनीची भूमिका कलाटणी देऊन गेली आणि तिथून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास ‘जुळूनि येती रेशीमगाठी’मधील माईपर्यंत पोहोचला, अशा शब्दांत ‘आभाळमाया’ फेम आणि मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीतील अभिनेत्या सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी अभिनय कारकिर्दीचा आलेख उलगडला. तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत चारूदत्त जोशी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. अभिनयाच्या कारकिर्दीबाबत सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या, पाचवीपासूनच नृत्य शिकायला सुरुवात केली. त्यावेळी भरतनाट्यममध्ये करिअर करण्याचा विचार होता. अभिनेत्री व्हायचा विचार कधी मनातही नव्हता. अनवधानाने या क्षेत्रात आले. ईश्वर हा पहिला चित्रपट केला. हा चित्रपट सुरू असतानाच वामन केंद्रेंच्या देवदासींवरील झुलवा या नाटकात जगनीची भूमिका केली. या भूमिकेने खूप नाव मिळाले.मालिका आणि चित्रपट इंडस्ट्रीबद्दल कुलकर्णी म्हणाल्या, काम करताना नेहमीच प्रसिद्धी आणि पैसा यांचा अतिरेकी मोह टाळण्याचा प्रयत्न केला. स्वत:वर विश्वास असल्यामुळे या क्षेत्रातील अपयशाची फारशी चिंता केली नाही.अपघातामुळे नृत्य बंद झाले. पॅरालिसिसमुळे बोलणेही बंद झाले होते; पण या घटनांतूनही सावरून अभिनयात दमदार पदार्पण केले.आताच्या मालिकांमध्ये मूळ कथांमध्ये अनेक उपकथा घुसडल्या जातात, हे खेदजनक आहे. आभाळमाया मालिकेचे पन्नास भाग तयार झाल्यावरच आम्ही काम सुरू केले; पण आता याबाबतीत गडबड ्नहोत आहे. टीआरपीसाठी या गोष्टी होत आहेत. कलाकारांमधील परस्पर विश्वास हरवत आहे. पूर्वी दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकार यांच्यात विश्वासाचे वातावरण होते. आता तशी परिस्थती राहिलेली नाही. मराठीमध्ये जो जिव्हाळा आहे, तो हिंदी चित्रपटसृष्टीत नाही. ‘सर्फरोश’मध्ये अमीर खानसोबत काम करण्याचा योग आला.