शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय महाडिकांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित केला; कार्यकारी संचालकांनी गुंतवणूक अन् ठेवीचा आकडाच सांगितला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:12 IST

वासाच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपये वाढीव दर

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांत पारदर्शक व दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार करत असताना ‘गोकुळ’च्या गुंतवणूक व ठेवींमध्ये १९० कोटींची वाढ करत हा टप्पा ५१२ कोटीपर्यंत पोहोचल्याची माहिती ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी पत्रकातून दिली. वासाच्या गाय दुधाला प्रतिलिटर ४ तर म्हैस दुधाला ६ रुपये देत असून पूर्वीपेक्षा वाढीव दोन व तीन रुपये दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.खासदार धनंजय महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा शनिवारी उपस्थित केला होता. त्यावर ‘गोकुळ’ प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली आहे.डॉ. गोडबोले म्हणाले, केंद्र शासनाच्या फूड सेफ्टी स्टँडर्ड कायद्यानुसार वासाचे अथवा भेसळयुक्त दूध हे बाजारात विक्रीस पुन्हा येऊ नये म्हणून नष्ट करणे बंधनकारक आहे. संघाने केवळ कायदा बघितला नाही, तर उत्पादकांचे आर्थिक हित केंद्रस्थानी ठेवून त्याला योग्य मोबदला देत आहोत. संघाच्या आगामी सर्वसाधारण सभेत यावर आणखी चर्चा करून दरवाढ करण्याचाही विचार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वच घटकांच्या सहकार्यामुळे गुंतवणूक, ठेवीसह सर्वच पातळीवर आपण चांगले काम करू शकलो.चार वर्षांत प्रतिदिनी ३.७२ लाख लिटरची वाढचार वर्षांपूर्वी रोज सरासरी १२.२२ लाख लिटर दूध संकलन होते. गेल्या चार वर्षात प्रतिदिनी ३.७२ लाख लिटरची वाढ झाल्याने आता १५.९४ लाख लिटरवर संकलन पोहोचले आहे. संघाच्या यशात जुन्या दूध संस्थांचा मोलाचा वाटा आहेच, त्याचबरोबर मागणी व दूध प्रक्रिया क्षमता, शेतकरी हित लक्षात घेऊनच नवीन संस्थांचा समावेश केल्याचे डॉ. गोडबोले यांनी म्हटले आहे.म्हशीला १२ तर गायीला ९ रुपयांची वाढगेल्या चार वर्षांत दूध उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये म्हैस दुधाला प्रतिलिटर बारा तर गाय दुधाला नऊ रुपयांची वाढ केल्याचे डॉ. गोडबोले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक