शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: संकेश्वर-आजरा-बांदा महामार्गावरील टोल विरोधात आजरावासियांचा धडक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 14:31 IST

टोल हटवून आजऱ्याचा टोलपॅटर्न देशभर - आमदार आबिटकर

सदाशिव मोरे आजरा : संकेश्वर - आजरा - बांदा महामार्गावर आजऱ्यानजीक उभारला जात असणारा टोलला हद्दपार करण्यासाठी हजरत तालुक्यातील जनतेने टोल नाक्यावर आज धडक मोर्चा काढला. टोल मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. टोल देणार नाही यासाठी गटतट पक्ष विरहित सर्वपक्षीय मोर्चात एकवटले. यामुळे आजरा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टोल हटवून आजऱ्याचा टोल पॅटर्न देशभर राबविणार असल्याचे आश्वासन आमदार प्रकाश आबिटकर यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. मोर्चा हॉटेल मिनर्वापासून सुरू झाला. टोल नाक्यावर गेल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी टोल कायमचा हद्दपार झालाच पाहिजे, टोलची टोलवाटोलवी थांबलीच पाहिजे, देणार नाही देणार नाही टोल देणार नाही, टोल मुक्ती संघर्ष  समितीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

आजरा तालुक्यातील जनतेला उध्वस्त करणारा टोल देणार नाही. रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण असताना टोल का ?  रस्त्याच्या बांधकामासाठी लागलेले पैसे राज्य सरकारने केंद्र सरकारला द्यावेत. पण आजरावासिय टोल देणार नाही असे कॉ. संपत देसाई, परशुराम बामणे, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, तानाजी देसाई, मुकुंद देसाई, शैलेश देशपांडे, वसंतराव धुरे, उमेश आपटे, डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितले. आजरावासीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असे माजी आमदार के. पी. पाटील व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटील यांनी सांगितले.जन आंदोलन, राजकीय दबाव व कायदेशीर लढाईतून आजऱ्याचा टोल हद्दपार केला जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून जन आंदोलनातून जनतेची ताकद दाखवू असे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. टोलबाबत आजरेकरांना त्रास होणार नाही याची काळजी घेवून निश्चित मार्ग काढू असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोबाईलवरून सांगितले.मोर्चात व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे, जनार्दन टोपले, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, सुधीर कुंभार, उमेश आपटे, अभिषेक शिंपी, अनिरुद्ध केसरकर, अनिकेत कवळेकर, जयवंत शिंपी, डॉ.अनिल देशपांडे, अल्बर्ट डिसोझा, एम.के. देसाई, अंजना रेडेकर, राजलक्ष्मी देसाई, रचना होलम,  मनीषा देसाई, विष्णू केसरकर, नामदेव नार्वेकर, संकेत सावंत यासह आजरा तालुकावासिय सहभागी झाले होते. टोलच्या लढ्याला विविध संघटनांनी पाठिंबा दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाagitationआंदोलन