शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

जोतिबा डोंगरावर भाविकांना लुटले अन‌् पोलिसांची झोप उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 12:03 IST

Crime News Kolhapur police- जोतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे सोन्याचे दागिने भरदिवसा अप्पा माने व त्याच्या चार साथीदारांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये लुटले. पाठोपाठ लुटीच्या तीन घटना घडल्या अन्‌ पोलिसांची झोप उडाली.

ठळक मुद्देजोतिबा डोंगरावर भाविकांना लुटले अन‌् पोलिसांची झोप उडालीआप्पाच्या मुसक्या आवळल्या : कोल्हापूर पोलिसांचे धाडसी नियोजनबद्ध ऑपरेशन

कोल्हापूर : जोतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे सोन्याचे दागिने भरदिवसा अप्पा माने व त्याच्या चार साथीदारांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये लुटले. पाठोपाठ लुटीच्या तीन घटना घडल्या अन्‌ पोलिसांची झोप उडाली.

टोळीने इतर ठिकाणीही दरोडा, वाटमारी, खंडणीचे गुन्हे केले. अखेर तब्बल अडीच वर्षांनी तो पुन्हा कोल्हापुरात परतला अन्‌ जाळ्यात अडकला. शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांशी त्यांची झटापट झाली. पोलिसांच्या नियोजनात जरा जरी चूक झाली असती तर त्याने पोलिसावरच फायरिंग केले असते.चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील महिला भाविक नातेवाइकांसोबत दि. ५ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी जोतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी गेले. सिद्धोबा मंदिराकडे पायी जाताना आरोपी अप्पा माने, दादासाहेब कोडोलकर, सचिन बलभीम कारंडे, शहाजी बबन लोखंडे (सर्व रा. फलटण) यांनी त्यांना अडवून मारहाण केली व १३ तोळे सोन्याचे दागिने लुटले. तत्पूर्वी टोळीकडून दि. २० ऑगस्टला आणखी दोन भाविकांना लुटल्याच्या नोंदी कोडोली पोलिसांत आहेत. कोडोलकर अद्याप फरार आहे, तर कारंडे व लोखंडे हे पुणे कारागृहात आहेत.... अन्यथा पोलिसांवर फायरिंग केले असते !आरोपी अप्पा माने व पप्पू सोनवलकर यांनी बेळगाव परिसरात ज्वेलर्सवर दरोडा घालण्यासाठी रेकी केली, तसेच ते गडहिंग्लजमार्गे कोल्हापुरात आले. त्यांची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. आरोपींनी यापूर्वी गुन्ह्यात फायरिंग केल्याने सुरक्षेसाठी निरीक्षक सावंत यांनी तीन पथके स्थापन केली.

राखीव दलाचे पोलीस निरीक्षक सत्यवान माशाळकर यांनी शीघ्र कृती दलाच्या पथकासोबत शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात दबा धरला. त्यावेळी विनानंबरच्या दुचाकीवरून संशयित अप्पा व पप्पू आले. त्यांना अडवले. पोलिसांचा संशय आल्याने आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. स.पो.नि. सत्यराज घुले व उपनिरीक्षक विनायक सपाटे यांनी सहकाऱ्यांसह त्यांच्यावर झडप घातली.

दोघांनी त्यांच्या कमरेच्या पिस्टलवर ताबा मिळविला. अन्यथा आरोपींनी पोलिसांवरच फायरिंग केले असते. पोलीस व आरोपींत झटापट झाली. अखेर आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडील दोन पिस्टलांसह २० जिवंत राऊंड, तीन मॅगजीन, मोबाईल, दुचाकी असे जप्त केले.

कारवाईमध्ये सहायक फौजदार महादेव कुराडे, अमोल कोळेकर, अर्जुन बंदरे, नितीन चोथे, अजय वाडेकर, कृष्णात पिंगळे, विलास किरोळकर, सचिन पाटील, अनिल पास्ते, नामदेव यादव, रणजित पाटील, संदीप कुंभार, सागर कांडगावे, तुकाराम राजिगरे, संतोष पाटील, महेश गवळी, राम कोळी, ओंकार परब, विठ्ठल मणिकरी, वैभव पाटील, तसेच मुख्यालयाकडील शीघ्र कृती दलाच्या पथकांचा सहभाग होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर