शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येलाच अंबाबाई मंदिर गजबजले, तोफेच्या सलामीने होईल घटस्थापना

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 14, 2023 19:05 IST

नवरात्रौत्सवात भाविकांना अंबाबाईची महागौरी, कामाक्षी, मोहिनी, महिषासूरमर्दिनी अशा वेगवेगळ्या रुपातील पूजा याची देही याची डोळा अनुभवता येणार

कोल्हापूर : विश्वाची उत्पत्ती, दुष्टांचा संहार करून भक्तांना अभय देणाऱ्या आदिशक्तीचा जागर करणारा नवरात्रौत्सव उद्या रविवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची तयारी पूर्ण झाली असून सकाळी साडे आठ वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना होईल. नवरात्रौत्सवात भाविकांना अंबाबाईची महागौरी, कामाक्षी, मोहिनी, महिषासूरमर्दिनी अशा वेगवेगळ्या रुपातील पूजा याची देही याची डोळा ्अनुभवता येणार आ्हे. उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच मंदिर अंबा माता की जयच्या गजराने दुमदुमून गेले आहे.अंबाबाईचा नवरात्रौत्सव देशभरात प्रसिद्ध असून याकाळात २५ लाखावर भाविकांची नोंद होते. घटस्थापनेला देवीची पारंपारिक बैठी पूजा बांधली जाते. सकाळी साडे अकराच्या शासकीय पूजेनंतर दुपारची आरती होईल त्यानंतर दुपारी ३ वाजता सालंकृत पूजा बांधण्यात येईल. उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच अंबाबाई मंदिर अंबा माता की जय च्या गजराने दुमदुमून गेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण मंडळे देवीची ज्योत नेण्यासाठी मंदिरात दाखल झाले आहेत. ज्योत लावल्यानंतर देवीच्या नावाचा गजर करून ते आपआपल्या गावाला मार्गस्थ होत आहेतगेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची तयारी पूर्ण झाली असून समितीच्या कार्यालयासमोर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य व सुंदर मांडव उभारण्यात आला आहे. तेथे मंदिर परिसराला करण्यात येणाऱ्या फुलांची रचना केली जात आहे.

माहिती केंद्राचे उदघाटनपागा इमारतीत सुरु करण्यात आलेल्या कायमस्वरुपी पर्यटन व माहिती केंद्राचे उदघाटन आज रविवारी सायंकाळी शाहू छत्रपती व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.

मोठा पोलीस बंदोबस्तयंदा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाविकांची संख्या वाढणार हे गृहीत धरून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून शनिवारी सायंकाळी बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. दक्षिण दरवाजाबाहेरील परिसरात पोलीस कंट्रोल रुम उभारण्यात आले आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर