देवेन काजवे महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:34+5:302021-07-18T04:17:34+5:30
१७०७२०२१-कोल-महाराष्ट्र हायस्कूल जीवन कल्याण माध्यमिक विद्यालय कोल्हापूर : कसबा बावड्यातील जीवन कल्याण माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के ...

देवेन काजवे महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रथम
१७०७२०२१-कोल-महाराष्ट्र हायस्कूल
जीवन कल्याण माध्यमिक विद्यालय
कोल्हापूर : कसबा बावड्यातील जीवन कल्याण माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. रूपेश विलास नाळे याने ९८.२० टक्के गुण मिळवून शाळेत पहिला येण्याचा मान पटकावला. शंभूराज शिवराज भोसले (९६.६० टक्के) द्वितीय, तर आदित्य बाबूराव चव्हाण (९७.४० टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. शाळेच्या ५७ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, तर प्रथम श्रेणीत ४६, चार जण उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष अरविंदकुमार रुईया, सचिव विजय घोरपडे, अरुण पाटील, मुख्याध्यापक जयसिंग पाटील व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
चनिशेटी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के
कोल्हापूर : निगवे (खालसा), ता. करवीर येथील चनिशेटी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के लागला. शाळेत सानिका सतीश पाटील हिने ९७.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला.
अन्य गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रतीक्षा मारुती पाटील (९७.४० टक्के) द्वितीय, तर श्रुतिका कृष्णात पाटील (९७.२० टक्के) तृतीय, आसावरी सुभाष पाटील (९६.८०), अमृता दिलीप पाटील (९६.००), समृद्धी प्रकाश पागम (९३.२०) टक्के गुण पटकावले. या विद्यार्थिनींना बी. आर. कदम, बी. जी. कांबळे, मुख्याध्यापक रवींद्र मोरे, संस्था अध्यक्ष शिवराज देसाई, सचिव बी. एस. किल्लेदार यांचे मार्गदर्शन लाभले.
१७०७२०२१-कोल- सानिका पाटील
१७०७२०२१-कोल-अमृता पाटील,
१७०७२०२१-कोल-प्रतीक्षा पाटील
१७०७२०२१-कोल-आसावरी पाटील,
१७०७२०२१-कोल-श्रुतिका पाटील
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील प्रेमसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक व आर्थिक मदत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दिली जाणार आहे. त्यासाठी योग्य गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांनी लेखी अर्जासह संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मांगलेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.